राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 2, 2026

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

 

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन



मुंबई(कटूसत्य वृत्त):-  देशाचे माजी गृहमंत्री दिवंगत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ४२व्या स्मृतिदिनानिमित्त राज्यपालांनी त्यांच्या प्रतिमेला देखील पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त राज्यपालांनी लोकभवनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.

यावेळी उपस्थितांनी देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा राखण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची शपथ घेतली, तसेच देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपले योगदान देण्याचा संकल्प केला.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सह सचिव एस. राममूर्ती तसेच लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच लोकभवन येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages