राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुशावर्त येथे सिंहस्थ ध्वजपूजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 2, 2026

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुशावर्त येथे सिंहस्थ ध्वजपूजन

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुशावर्त येथे सिंहस्थ ध्वजपूजन



नाशिक, दि. ३१: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त ध्वजपूजन सोहळा धार्मिक व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते गौतमी गंगा गोदावरी पूजन, सिंहस्थ ध्वजपूजन, विशेष अर्घ्य अर्पण तसेच गोदावरी आरती करण्यात आली.

या सोहळ्यास राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, रोहयो व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कुशावर्त येथे आगमन झाल्यानंतर धार्मिक विधींना प्रारंभ झाला. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात राष्ट्रपतींच्या हस्ते पवित्र गौतमी गंगा गोदावरीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर सिंहस्थ ध्वजाचे पूजन करण्यात आले. विशेष अर्घ्य अर्पण करून गोदावरीची आरती करण्यात आली. वैदिक मंत्रघोष आणि धार्मिक विधींमुळे कुशावर्त तीर्थ परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या धार्मिक सोहळ्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले. कुशावर्त तीर्थ हे गोदावरी नदीचे पवित्र स्थान असून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक परंपरेत या तीर्थाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

या कार्यक्रमास आमदार गोकुळ गीते, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, श्री हरिगिरीजी महाराज, विविध आखाड्यांचे साधू, महंत, स्थानिक राहिवासी आदी उपस्थित होते.

या प्रसंगी पुरोहित संघाच्यावतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सन्मानपूर्वक ताम्रपट प्रदान करण्यात आला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages