मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 2, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन




नाशिक(कटूसत्य वृत्त):-   सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण पर्वाच्या निमित्ताने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील नवीन गोदाघाटावर उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभाचे विधिवत पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री गणेश पूजनही करण्यात आले.

सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथे नवीन गोदाघाटाची उभारणी करण्यात आली असून, या ठिकाणी आयोजित ध्वजस्तंभ पूजन सोहळा धार्मिक व भक्तिमय वातावरणात पार पडला. वैदिक मंत्रोच्चार आणि पारंपरिक धार्मिक विधींनी या सोहळ्याला मंगलमय स्वरूप प्राप्त झाले.

या सोहळ्यास साधुसंत, महंत, विविध आखाड्यांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या ध्वजस्तंभ पूजन सोहळ्याला धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages