आटपाडीची सार्वजनिक आरोग्य सेवा सक्षम, समृद्ध, लक्षवेधी करा. - सादिक खाटीक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 6, 2026

आटपाडीची सार्वजनिक आरोग्य सेवा सक्षम, समृद्ध, लक्षवेधी करा. - सादिक खाटीक

 आटपाडीची सार्वजनिक आरोग्य सेवा सक्षम, समृद्ध, लक्षवेधी करा. - सादिक खाटीक

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदारांचे वेधले लक्ष .




आटपाडी (कटूसत्य वृत्त):- राज्य शासनाने आटपाडी तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा सक्षम, समृद्ध आणि लक्षवेधी करावी . असे आवाहन कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्लीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केले आहे .
          राज्याचे मुख्यमंत्री ना . देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना . एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना . सुनेत्राताई पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे खास ईमेल द्वारे लक्ष वेधून सादिक खाटीक यांनी ही मागणी केली आहे .
          आमदार जयंतराव पाटील, आमदार सुहास बाबर, आमदार रोहितदादा पाटील, खासदार विशालदादा पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार विश्वजीत कदम, आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सत्यजीत देशमुख, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सदाभाऊ खोत, आमदार हर्षदा देशमुख - जाधव यांचेही या अति अत्यावश्यक प्रश्नांकडे सादिक खाटीक यांनी खास लक्ष वेधले आहे .
          आटपाडी तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी आणि आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी खालील मुद्द्यांवर तात्काळ कार्यवाही व्हावी . असे प्रारंभीच स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी, गाव तेथे आरोग्य मंदिर उभारले जावे . आटपाडी तालुक्यात ५३ ग्रामपंचायती व नगरपंचायत तसेच ४ महसुल गावे आहेत . त्या पैकी ३४ ग्रामपंचायती मध्ये या आरोग्य मंदिराची गरज आहे . त्या ठिकाणी लसीकरण CHO गाव भेट, आशा स्वयंसेविका व इतर आरोग्य कर्मचारी यांना आरोग्य सेवा देण्यासाठी सोयीचे होईल आज आरोग्य सुविधा देताना ग्रामपंचायतीमध्ये किंवा मंदिरामध्ये आरोग्य सेवा दिल्या जात आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आरोग्य मंदिर होणे गरजेचे आहे .
ट्रॉमा केअर सेंटर : पंढरपूर - गुहागर, अथणी - आटपाडी - अकलूज आणि पंढरपूर - मल्हारपेठ असे आटपाडी तालुक्यातून महामार्ग आहेत . या प्रमुख रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आटपाडी तालुक्याची लोकसंख्या सुमारे १,५२,००० असून अपघात व मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. यासाठी सर्व सोयींनी युक्त ट्रॉमा केअर सेंटर आणि कुशल डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे . 
 स्वतंत्र स्त्री रुग्णालय व बाळ रुग्णालय ) : आटपाडी तालुक्यात प्रतिवर्षी सुमारे ३,००० प्रसुती होतात, ज्यामध्ये सिझरियन ( LSCS ), ७०० ते ८०० स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया आणि यासाठी सोनोग्राफी ( USG ) सुविधेसह सर्व आधुनिक साधनांनी युक्त स्वतंत्र मॅटर्निटी केअर युनिट व नवजात बालकांना शिशू केअर युनिट येथे सुरू केले जावे .
अतिदक्षता विभाग : आटपाडी पासून सांगली , कराड , मिरज ही तृतीयस्तरीय उपचार केंद्रे सुमारे ११० किमी अंतरावर आहेत. गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने रस्त्यातच प्राणास मुकावे लागते. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय ( RH ) आटपाडी येथे २५ खाटांचे सर्वोपचार अतिदक्षता केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे. 
 GNM Nursing College
आटपाडी तालुक्यात GNM नर्सिंग कॉलेज मंजूर करण्यात यावे. ग्रामीण रुग्णालय आटपाडी ( ५० खाटा ), आर.एच. खरसुंडी ( २५ खाटा ), आर. एच. दिघंची ( २५ खाटा ), विशेष मॅटर्निटी ( ५० खाटा ), प्राथमिक आरोग्य केंद्र ( २८ खाटा ) व नवीन पी.एच.सी. ( १४ खाटा ) मिळून एकूण १९२ खाटांची क्षमता उपलब्ध होऊ शकते. यासाठी तातडीने जीएनएम नर्सिंग कॉलेज मिळावे .
मोतीबिंदू शस्त्रक्रिया विभाग : RH आटपाडी येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि संगणकीय नेत्र तपासणी युनिट जोडण्यात यावे. खाजगी रुग्णालयात ही सुविधा देण्यात येत आहे . तरी शासकीय रुग्णालयात मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जावी .
Palliative Care Unit :
आर. एच. आटपाडी येथे २५ खाटांचे इन - पेशंट ( IPD ) पॅलियाटिव्ह केअर युनिट सुरू करावे.
कर्करोग पैरालिसिस आणि अन्य गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांसाठी मोफत सुविधा उपलब्ध व्हावी .
आरोग्य पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण : आर. एच. आटपाडीचे नवीन ५० खाटांचे रुग्णालय पूर्ण क्षमतेने तात्काळ कार्यान्वित करावे. सिद्धनाथ नगरी खरसुंडी साठी RH मंजूर आहे . ते तातडीन कार्यान्वीत करावे आणि RH दिघंचीचे काम तातडीने सुरू करावे. तसेच सध्याचे खरसुंडी व दिघंचीचे पी. एच. सी. हे अन्य योग्य ठिकाणी स्थलांतरित करून सुरू करावेत. आटपाडी नगरपंचायत झाल्यामुळे तेथे नगरपंचायत रुग्णालय सुरू करून पी. एच. सी. आटपाडी अन्य योग्य गावात स्थलांतरित करावी. नव्याने मंजूर प्राथमिक आरोग्य केंद्रे झरे व शेटफळे येथे तातडीने सुरू करावेत. 
उपकेंद्र: २०१३ मध्ये मंजूर झालेले उपकेंद्र पुजारवाडी ( दिघंची ) जागेच्या प्रश्नामुळे अद्याप अपूर्ण आहे, तो प्रश्न सोडवून ते तात्काळ सुरू करावे. नव्याने मंजूर उपकेंद्र बनपुरी तात्काळ कार्यान्वित करावे. 
तळेवाडी, राजेवाडी, बोंबेवाडी आणि विभूतवाडी येथे नवीन उपकेंद्रे मंजूर करण्यात यावीत.आटपाडी तालुक्यातील ६० पैकी ३४ गावांमध्ये नवीन आरोग्य मंदिरांची स्थापना करण्यात यावी, जेणेकरून लसीकरण, औषध वाटप व आशा वर्करसाठी सुविधा उपलब्ध होईल. 
संरक्षक भिंत व कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था : शासकीय रुग्णालयांच्या इमारतींची दुरुस्ती, कर्मचाऱ्यांची वस्तीगृहे आणि प्रलंबित असलेल्या संरक्षक भिंतींचे काम तातडीने पूर्ण करावे.
रक्त साठवणूक केंद्र ( Blood Storage Unit ) :
आर. एच. आटपाडी येथे रक्त साठवणूक केंद्राची सर्व तयारी पूर्ण झाली असूनही ते अद्याप सुरू नाही, ते तात्काळ सुरू करण्यात यावे. 
शासकीय जेनेरिक मेडिकल : प्रत्येक RH व पी. एच. सी. मध्ये शासकीय जेनेरिक मेडिकल स्टोअर सुरू करावे.
कार्डियाक ॲम्बुलेंस : आटपाडी साठी आणखी एक कार्डीयाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली जावी. तसेच आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागासाठी ( नेलकरंजी ते झरे मार्ग ) अतिरिक्त १०८ कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी. 
खाजगी डॉक्टर व शासकीय योजना ( Private Doctors & Schemes ): खाजगी डॉक्टरांना व रुग्णालयांना महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना ( MJPY ) व कॅशलेस सेवा राबवण्यासाठी प्रोत्साहन व पाठबळ द्यावे. 
 कॅथ लॅब :
हृदय विकार प्रकार खूप वाढलेला आहे त्यासाठी कार्डिनल मार्कर ब्लड टेस्ट व कॅथ लॅबची सोय अती अत्यावश्यक आहे . निदान योग्य उपचार सुविधा तातडीने उपलब्ध करून दिल्या जाव्यात .
एम. आर. आय. व सीटी स्कॅन सुविधा : तालुक्यात एम. आर. आय. व सीटी स्कॅन व डायलेसिसची सुविधा निर्माण करण्याबाबत नियोजन करावे.
 बायोमेडिकल वेस्ट :
विल्हेवाटीसाठी छोटा भस्मक प्रकल्प ( Incineration Plant ) उभारण्यात यावा. 
आय. एम. ए. हॉल ( IMA Hall .): आटपाडी नगरपंचायतीने आय. एम. ए. हॉलसाठी जागा उपलब्ध करून दिली असल्याने, तालुक्याच्या केंद्र ठिकाणी हॉल उभारणीस मदत करावी. डॉक्टरांची मीटिंग किंवा सीएमई साठी या हॉलची आवश्यकता असल्याकडे शासन आणि लोकप्रतिनिर्धीचे लक्ष वेधले आहे .
          या सर्व महत्वाच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या पुर्णत्वास नेण्यासाठी शासनाकडून योग्य ते तातडीने निर्णय व्हावेत . संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते आदेश द्यावेत. अशी अपेक्षा ही सादिक खाटीक यांनी शेवटी व्यक्त केली आहे .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages