सेवा संकल्प अभियानात माढा तालुका जिल्ह्यात प्रथम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 6, 2026

सेवा संकल्प अभियानात माढा तालुका जिल्ह्यात प्रथम

 सेवा संकल्प अभियानात माढा तालुका जिल्ह्यात प्रथम

जिल्हा स्तरावर गौरवपत्र देऊन सन्मान; कुर्डू प्रभागाचाही प्रथम क्रमांक



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) राबविण्यात आलेल्या रुक्मिणीसप्ताह व सेवा संकल्प अभियान-२०२६ मध्ये माढा तालुक्याने सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने माढा तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाला गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
       ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, बचत गटांना उद्योग-व्यवसायासाठी प्रोत्साहन, कर्ज प्रस्तावांची पूर्तता, जनसमर्थ पोर्टलवरील नोंदी आणि बँकांशी समन्वय अशा विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. तालुका व प्रभागस्तरीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामसंघ, प्रभागसंघ आणि महिला बचत गटांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश मिळाले.
     या अभियानात कुर्डू प्रभागानेही जिल्हा स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल प्रभाग समन्वयक नीता काळे शिंदे यांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
      तालुका अभियान व्यवस्थापक अवधुत देशमुख यांनी या यशाचे श्रेय सर्व अधिकारी, कर्मचारी, समुदाय संवर्गातील व्यक्ती आणि महिला बचत गटांच्या सामूहिक परिश्रमांना दिले.
       पुरस्कार वितरण समारंभास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
         या यशाबद्दल गटविकास अधिकारी महेश सुळे, पंचायत समिती सभापती पंडित देशमुख, उपसभापती स्वाती गिड्डे आणि गटनेते डॉ. आशिष राजपूत यांनी माढा तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages