महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 5, 2026

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात रक्तदान  शिबिर उत्साहात संपन्न




नाशिक (कटूसत्य वृत्त):-   आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते व कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विज्ञान विद्यापीठ व जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  
   याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गायकवाड यांनी सांगितले की, आजच्या धकाधकीच्या युगात रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी अशा शिबिरांची अत्यंत गरज आहे. विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठया प्रमाणात घेतलेला सहभाग हा सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे. सध्या रक्तदान ही काळाची गरज आहे. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे समाजात विविध आजारांचे वाढणारे प्रमाण, वारंवार होणारे अपघात, शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण यामुळे रक्ताला खूप मागणी आहे. आजच्या काळात रक्तदानाचे महत्व जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
या रक्तदान शिबिरास मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. यावेळी सर्व इच्छुक रक्तदात्यांची शारीरिक तपासणी करुनच रक्तदानासाठी आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींनीच रक्तदान करावे याची खबरदारी घेण्यात आली. या रक्तदान शिबिराकरीता जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक येथील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दुसाने, जनसंपर्क अधिकारी  श्री. मंगेश राठोड, समुपदेशक श्री. तन्वीर मन्सुरी, श्री. विलास गावीत आदी सहभागी झाले होते. या शिबिराकरीता श्रीमती मानसी हिरे, श्री. अनिल पावरा, श्री. दिगंबर खैरनार, श्री. मनोहर गवळी, श्रीमती शितल गवळी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages