वेळापूर व वाडीकुरोलीला विजेतेपद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 25, 2026

वेळापूर व वाडीकुरोलीला विजेतेपद

 वेळापूर व वाडीकुरोलीला विजेतेपद

पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा



सोलापूर(कटूसत्य वृत्त):- वेळापूरचे अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ व वाडीकुरोलीच्या (ता. पंढरपूर) कल्याणराव काळे स्पोर्टस्‌‍ क्लबने अनुक्रमे पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने वेळापूरच्या अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळाने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार उत्तमराव जानकर यांनी केले. यावेळी वेळापूरचे उपसरपंच नानासो मुंगुसकर, इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक रमेश पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य आबा मंडले,  सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे सचिव उमाकांत गायकवाड, खजिनदार श्रीरंग बनसोडे, सहसचिव मोहन रजपूत, तांत्रिक समिती सचिव शिवशंकर राठोड, सदस्य शरद व्हनकडे, सोमनाथ बनसोडे, अजित शिंदे, पुंडलिक कलखांबकर, प्रा. विजय दत्तू, साक्षी देठे, सतीश कदम, शिवाजी जाधव, नागेश माडीकर, जावेद आतार, अतुल निकंबे, गोरख ढेरे, दादासाहेब बर्डे, शेखलाल शेख, विजय अडगळे, प्रवीण गोवे, अतुल जाधव, नौशाद मुजावर आदी उपस्थित होते.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात अजय कश्यप (2 मिनिटे), शंभूराजे चंदनशिव (1मिनिटे व 3 गुण), कृष्णा बनसोडे (1.50 मिनिटे व 2 गुण) व सिद्धार्थ माने-देशमुख (2.10 मिनिटे) यांच्या शानदार खेळीमुळे वेळापूरने येथील उत्कर्ष क्रीडा मंडळाचा 15-13 असा2 गुण 4.20 मिनिटे राखून पराभव केला. उत्कर्षकडून जुबेर शेख (1.10,1.10 मिनिटे व 4 गुण), अक्षय गवळी (4 गुण) यांनी लढत दिली. महिला गटात के.के. स्पोर्टस क्लबने वाडीकुरोलीने छत्रपती शिवाजी प्रशाला वीट (करमाळा) या संघावर 14-2 असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळविला.
अंतिम निकाल (प्रथम चार संघ) पुरुष ः अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ (वेळापूर), उत्कर्ष क्रीडा मंडळ (सोलापूर), शिवप्रतिष्ठान (मंगळवेढा), किरण स्पोर्टस्‌‍ क्लब (सोलापूर).
महिला ः कल्याणराव काळे स्पोर्टस्‌‍ क्लब (वाडीकुरोली, ता. पंढरपूर), छत्रपती शिवाजी प्रशाला वीट (करमाळा),  अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ (वेळापूर, ता. माळशिरस), समृध्दी स्पोर्टस्‌‍ क्लब (सोलापूर).

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages