चातुर्मास सेवेनिमित्त मल्लेश पुरवंत यांचा सन्मान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 26, 2026

चातुर्मास सेवेनिमित्त मल्लेश पुरवंत यांचा सन्मान

 चातुर्मास सेवेनिमित्त मल्लेश पुरवंत यांचा सन्मान 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- तुळजापूर वेस,बलिदान चौक येथील श्री जैन श्वेतांबर स्थानकवासी संघातर्फे यंदाच्या चातुर्मासानिमित्त 'वे ऑफ लाइफ'च्या प्रणेत्या परमपूज्य अक्षयश्रीजी महाराज यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.

बलिदान चौक येथील जैन स्थानकात साध्वी मनोहर नगर लोणावत व्याख्यान हॉलमध्ये हे प्रवचन आयोजित करण्यात आले होते.दररोज सकाळी नऊ ते दहा या वेळेत अक्षयश्रीजी महाराज यांचे प्रवचन होते. या प्रवचनाचे  जवळजवळ चार महिनेहून अधिक काळ वृत्त संकलन करण्याचे काम मल्लेश पुरवंत यांनी केले. या प्रवचन सेवेबद्दल त्यांचा जैन श्वेतांबर स्थानकवासी संघातर्फे शाल, मोत्याची माळ देऊन सन्मान करण्यात आला.परमपूज्य अक्षयश्रीजी,परमपूज्य मल्लिश्रीजी, परमपूज्य विभवश्रीजी,परमपूज्य संयमश्रीजी महाराज यांच्या दिव्य व मंगल सानिध्यात श्री.पुरवंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष पदम राका,जितेंद्र बलदोटा,राजाभाऊ गांधी,गौतम संचेती यांचेसह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.यापूर्वी श्री. पुरवंत यांचे प्रबुद्ध विचारक आदर्शऋषी यांच्या प्रवचना वरील पुस्तक हिंदी व मराठी भाषेत प्रसिद्ध झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages