ग्रंथपालन परीक्षेत स्नेहा बाचके सोलापूर केंद्रात प्रथम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 2, 2026

ग्रंथपालन परीक्षेत स्नेहा बाचके सोलापूर केंद्रात प्रथम

 ग्रंथपालन परीक्षेत स्नेहा बाचके सोलापूर केंद्रात प्रथम




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी घेतलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा-2026 च्या परीक्षेत सोलापूर केंद्रातून 700 पैकी 470 गुण मिळवून स्नेहा श्रीकांत बाचके प्रथम, 469 गुण मिळवून प्रणिती प्रकाश क्षिरसागर द्वितीय तर 468 गुण मिळवून प्रथमेश दत्तात्रय बनसोडे तृतीय आले आहेत. सोलापूर केंद्राचा निकाला 66.66% लागला. राज्यातून 29 केंद्रातून 1904 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. राज्याचा 61% निकाल लागला. सोलापूर केंद्रात पहिल्या 3 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रंथपालन वर्गाच्या या आमच्या यशात ग्रंथपालन वर्गाचे वर्गव्यवस्थापक ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, परीक्षाधिकारी श्रीकांत संगेपांग, वर्गाचे मुख्याध्यापक अविनाश गायकवाड सर विषय शिक्षक सौ. वृषाली हजारे, गणेश फंड, जाफर बांगी, दत्ता मोरे वर्गाच्या ग्रंथपाल सौ. सारीका माडीकर, लिपिक गीतांजली गंभिरे, शिपाई दत्ता पोलके, जगदीश सावळगी, प्रदिप गाडे, यांचे सहकार्य असल्यानेच हे यश मिळू शकले असे मनोगत वर्गात प्रथम आलेल्या स्नेहा बाचके यांनी व्यक्त केले. सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ज्योतीराम गायकवाड, कार्यवाह साहेबराव शिंदे आणि सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages