सुसंवादाने, ज्येष्टांच्या आणि मुस्लीम खाटीक बांधवांच्या प्रश्नांना मिळणार गती . - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 21, 2026

सुसंवादाने, ज्येष्टांच्या आणि मुस्लीम खाटीक बांधवांच्या प्रश्नांना मिळणार गती .

  सुसंवादाने, ज्येष्टांच्या आणि मुस्लीम खाटीक बांधवांच्या प्रश्नांना मिळणार गती .

माजी आमदार राम गुंडीले आणि ॲड . सनोबर अली कुरेशी यांच्यात सुसंवाद !




नवी दिल्ली(कटूसत्य वृत्त):-        अर्थक्रांती जीवन गौरव ज्येष्ट नागरीक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी आमदार राम गुंडीले यांचा कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष, तथा सुप्रिम कोर्टात वकीली करणारे ॲड . सनोबर अली कुरेशी यांनी सदिच्छा भेट घेत त्यांचा शाल बुके देऊन सन्मान केला .
          दिल्ली येथील केजी मार्गावरील महाराष्ट्र भवनात दि १७ रोजी ही सदिच्छा भेट झाली . तासभराच्या भेटीत या दोन्ही मान्यवरांनी आपल्या संघटनेच्या कार्याची माहिती दिली. देशभरात चाललेल्या कार्याचा इत्यंभूत लेखा जोखा या मान्यवरांनी उपस्थित केला .
          ६० वर्षावरील ज्येष्ट नागरीकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषीत करावे . त्यांना १०००० रुपये सन्मानधन द्यावे . ज्येष्ट नागरीकांना सर्व क्षेत्रात प्रथम प्राधान्याने सोयी सवलती आरक्षण द्यावे . ज्येष्ट नागरीकांच्या सर्व प्रश्न समस्या अडचणी उपाय योजना यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर खास नवे मंत्रालय स्थापन केले जावे . ज्येष्ठांचा सन्मान, संरक्षण आणि मालमत्तांच्या संरक्षणासाठी ॲट्रासिटी कायद्याचे संरक्षण मिळावे . अर्थसंकल्पात ज्येष्ठांसाठी भरीत तरतुद केली जावी . ज्येष्टांसाठी बँकात स्वतंत्र विभाग निर्माण केला जावा . एस . टी . सीटी बस, रेल्वे वाहतूक यामध्ये ज्येष्टांना प्राधान्याने सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाव्यात यासह अनेक प्रश्नांवर आम्ही शासनाशी संघर्ष सुरू ठेवला असल्याचे माजी आमदार राम गुंडीले यांनी या बैठकीत स्पष्ट केले .
          देशातल्या मुस्लीम खाटीक, कुरेश, कसाई, कसाब या समुदायाच्या सर्वच प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आमची कुरेश कॉन्फरस कार्यरत असून ज्येष्ट मंडळी माता भगिनी युवक युवती यांच्या माध्यमातून सर्व समाज घटकांना शासनाच्या मदतीने मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे . मुस्लीम खाटीक वगैरे मुस्लिमांतील मागासांना १९३६ ते १९५० या दरम्यान मिळणारी अनुसुचित जाती आरक्षणाची सवलत पुन्हा मिळावी आणि धर्मांतरीत असल्याचा शासकीय समिती, कमिशन, आयोगांचा अभिप्राय लक्षात घेऊन मागास मुस्लिमांना नवमुस्लीम म्हणून अनुसुचित जातीचे आरक्षण पुन्हा बहाल केले जावे यासाठी आमचा सर्व पातळी वरून सुरू असल्याचे आणि या बाबतचा रिट सुप्रीम कोर्टात दाखल असल्याचे ॲड . सनोबर अली कुरेशी यांनी निदर्शनास आणले .
          माजी आमदार राम गुंडीले आणि ॲड . सनोबर अली कुरेशी यांनी आपल्या नेतृत्वा खालील संघटनेच्या प्रश्नांवर एकमेकाला साथ समर्थन देण्याची ग्वाही एकमेकांना दिली .
          कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी ( ऑर्गनायझेशन ) निजामुद्दीन कुरेशी ऑफीस सेक्रेटरी मोहमंद उमेर, ॲड . सनोबर अली कुरेशी यांचे लॉ सहाय्यक अदनान कुरेशी हे उपस्थित होते .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages