सुसंवादाने, ज्येष्टांच्या आणि मुस्लीम खाटीक बांधवांच्या प्रश्नांना मिळणार गती . - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 21, 2026

सुसंवादाने, ज्येष्टांच्या आणि मुस्लीम खाटीक बांधवांच्या प्रश्नांना मिळणार गती .

  सुसंवादाने, ज्येष्टांच्या आणि मुस्लीम खाटीक बांधवांच्या प्रश्नांना मिळणार गती .





पंढरपुर (कटूसत्य वृत्त):-    सोलापूर जिल्ह्याचे लोकनेते सुधाकरपंत परिचारक हे राज्याचे मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे सर्वसंपन्न नेते होते . असे गौरवोदगार कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक यांनी काढले .
          पंढरपुरचे दिवंगत नेते, माजी आमदार, राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष, आटपाडीशी नातेसंबंध असणारे खरेखुरे लोकनायक सुधाकरपंत परिचारक यांच्या ९१ व्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या पवित्र आत्म्यास आणि प्रतिमेस सादिक खाटीक यांनी अभिवादन केले . या औचित्याने त्यांनी हे गौरवोदगार काढले .
          पंढरपुर येथील उमा महाविद्यालयात आटपाडी तालुक्याचे सुपुत्र, उमा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . धीरजकुमार बाड यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी योगायोगाने महाविद्यालयात आलेल्या सादिक खाटीक यांनी सुधाकरपंत परिचारक साहेबांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेतला. राजकारण, समाजकारण, शिक्षण सहकार, व्यापार, उद्योग, शेती इत्यादी अनेक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणारे सुधाकरराव परिचारक साहेब नेक इन्सान होते . श्री .पांडुरंगाचे सच्चे सेवक होते . राजकारणात इतका सज्जन, चारित्र्यसंपन्न व्यक्ती शोधूनही सापडणार नाही .
          स्वातंत्र्या नंतरच्या ७९ वर्षात आज अखेर कोणताही पंढरपूरकर केंद्रात अथवा राज्यातील सरकारमध्ये राज्यमंत्री अथवा कॅबिनेट मंत्री होऊ शकला नाही . ७ पेक्षा जास्त वेळा पंढरपुर मतदारसंघातून खासदार झालेले संदिपान थोरात हे ही केंद्रीय मंत्रीपदापासून वंचित राहिले . परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष पदामुळे नामदार झालेल्या सुधाकरपंत परिचारक यांचे कर्तृत्व महामंडळाच्या पदाहून प्रचंड मोठे होते . श्री . सुशिलकुमार शिंदे साहेबांना राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री पदाची संधी मिळाली. त्याच त्यांनी सोने केले . पंढरपुराशी जोडलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघाचा एकमेव अपवाद सुशीलकुमार शिंदे साहेबांचे केंद्राचे मंत्रीपद ठरू शकते . तथापि सुधाकरपंत परिचारक साहेबांना मंत्री, मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली असती ते देशातील सर्वात प्रभावी नेते म्हणून सर्वसिद्ध झाले असते . दुर्देवाने त्यांना नियतीने, तत्कालीन राजकीय स्थितीने ही संधी मिळू दिली नाही . सुधाकरपंत परिचारक यांच्या मुशीत तयार झालेला, परिचारकांच्या परिवारातला, सर्वमान्य, सर्वस्पर्शी, सर्वप्रिय आणि सर्वोत्तम नेता, पंढरपुरातुन राज्याचा पहिला कॅबिनेट मंत्री व्हावा . अशीच माझी मनोभावना आहे . परिचारक साहेबांच्या परिवारातला लोकनायक, जननायक भविष्यात मंत्री होणे, हेच खरे सुधाकरपंत परिचारक यांना अभिवादन ठरेल असे मला वाटते .
          श्री . विठ्ठलाच्या पवित्र भुमी पंढरीतच माझा जन्म झाला . हे माझे आजोळ आहे . सजन कसाया विकु लागे मास असे आपल्या तुकाराम गाथेत नमुद करीत साक्षात श्री . पांडुरंग सजन कसाई यांना त्यांच्या व्यवसायात मदत करत असल्याचा निर्वाळा देत राष्ट्रसंत तुकाराम महाराजांनी प्रकाश टाकलेले श्री . पांडुरंगाचे निस्सिम भक्त, संत सजन कसाई यांच्या विचारधारेचा मी पाईक आहे . तीन दशकापूर्वी थकीत उसबीलाच्या वसुलीसाठी आटपाडीत आंदोलन छेडलेल्या सुधाकरपंत परिचारक साहेबांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला त्याकाळी स्थानिकांच्या विरोधात जावून व्यापक प्रसिद्धी देणारा मी एकमेव पत्रकार होतो . अशी आठवण यावेळी सादिक खाटीक यांनी आवर्जून सांगीतली .
          यावेळी उमा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धीरजकुमार बाड, मुख्य लिपीक सज्जन लोंढे, वरीष्ट लिपिक समाधान लोकरे, ग्रंथालय परिचर पैंगबर शेख , महंमदगौस भडाळे इत्यादी अनेक जण उपस्थित होते .


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages