उजनीतून भिमानदीत पाणी २२ ऑक्टोबरला सोडणार- पालकमंत्री जयकुमार गोरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 22, 2026

उजनीतून भिमानदीत पाणी २२ ऑक्टोबरला सोडणार- पालकमंत्री जयकुमार गोरे

 उजनीतून भिमानदीत पाणी २२ ऑक्टोबरला सोडणार- पालकमंत्री जयकुमार गोरे



पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-   पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या प्रचार दौऱ्यानिमित्त सोमवार दि १९ ऑक्टोबर रोजी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालय पंढरपूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत उमेदवार श्री. कौस्तुभ गावडे व डॉ. सौ. स्मिता जाधव यांच्या प्रचारासंदर्भात चर्चा करण्यात आली.

या बैठकीस आमदार समाधान अवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे,विठ्ठल हॉस्पिटलचे अध्यक्ष युवराज पाटील, धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील, व्हा.चेअरमन मोहन (बापू) नागटिळक, माजी व्हा.चेअरमन भारतनाना कोळेकर, कारखान्याचे सर्व संचालक, निशिगंधा बँकेचे चेअरमन आर.बी.जाधव, संचालक अनिल खिस्ते, राष्ट्रवादी कॉंग्रस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे, शहराध्यक्ष महमद उस्ताद, प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विलासराव काळे व सर्व संचालक, श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व शिक्षक, वसंतराव काळे आयटीआय धोंडेवाडी येथील सर्व शिक्षक, यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे व सर्व संचालक, संपर्क कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच शिक्षक व पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरवातीस कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीच्या मताने विजयी होतील अशी ग्वाही दिली. उशिरा निरोप देऊन मोठ्या संख्याने शिक्षक व पदवीधर मतदार उपस्थित राहिल्या बद्दल त्यांचे आभार मानले. कर्तव्यदक्ष पालकमंत्री महोदयाचा कामाबद्दल गौरव उदगार काढून भिमा नदीला पाणी व ८ तास लाईट सोडण्याची लेखी निवेदन देऊन आपल्या भाषणात त्यांना विनंती ही यावेळी काळे यांनी केली.

पालकमंत्री गोरे यांनी आपल्या भाषणात उपस्थितीत शिक्षक व पदवीधर यांना उमेदवार श्री. कौस्तुभ गावडे व डॉ. सौ. स्मिता जाधव यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन निवडून आणावे असे आव्हान करत कल्याणराव काळे यांनी केलेल्या लाईट व भिमानदीला पाणी सोडणेबाबत मागणीचा धागा पकडत २२ ऑक्टोबरला उजनीतून नदीला पाणी सोडले जाईल व नदीकाठचा विद्युत पुरवठा ८ तास मागणीचा विचार करु असे आश्वासन देत जलसंकटावर मात करण्यासाठी पाणी जपून वापरा असे आव्हान यावेळी त्यांनी केले.       

यावेळी उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी समन्वयाने काम करण्याच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले. या संवाद बैठकीमुळे पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या प्रचाराला पंढरपूर परिसरात गती देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. उपस्थितांचे आभार राष्ट्रवादी कॉंग्रस पार्टीचे तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक यांनी केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages