उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यास पालकमंत्री सकारात्मक... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 22, 2026

उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यास पालकमंत्री सकारात्मक...

 उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यास पालकमंत्री सकारात्मक... 


                     



    टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-      उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास पालकमंत्री सकारात्मक असून आगामी तीन ते चार दिवसात भीमा नदी काठच्या नागरिकांना पिण्यासाठी पाणी सोडले जाणार  असून भीमा नदी मधील को.प.चे सर्व  बंधारे भरून घेतले जाणार आहेत अशी माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा भाजपा युवा नेते रणजीत सिंह शिंदे यांनी दिली आहे.
      विशेष वृत्त सांगताना रणजीत शिंदे म्हणाले  की वेणेगाव (टेंभुर्णी )येथे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील भारतीय जनता पक्ष - महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या मेळाव्याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उपस्थित होते, याप्रसंगी त्यांना सध्याच्या अवर्षणग्रस्त दुष्काळी परिस्थितीमध्ये भीमा नदी मधील बंधारे कोरडे पडले आहेत, नदी काठावरील इंदापूर माळशिरस माढा पंढरपूर मंगळवेढा आदी तालुक्यातील  शेकडो गावे आणि वाड्यावरस्त्यावर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे, नदीवरून असलेल्या पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत व त्यामुळे हजारो नागरिक आणि पशुधन यांना पिण्यासाठी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे म्हणून उजनीतून भीमा नदीत तातडीने पाणी सोडणे अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक  असल्याचे  निदर्शनास आणून दिले असता पालकमंत्री ना.गोरे यांनी तातडीने या मागणीस सकारात्मकता दर्शवून जलसंपदा मंत्री नामदार विखे पाटील यांचेशी  तातडीने चर्चा करून आगामी तीन ते चार दिवसाच्या आत उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले जाईल  याबद्दल निश्चिंत रहा असे आश्वासित केले .
चौकट....
भीमा नदीत पाच ते सहा टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन ....
   ....... जिल्हाधिकारी
        
  रणजीत शिंदे यांचे बरोबर माझी याबाबत चर्चा झालेली आहे ,सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये (डिझास्टर सरकमस्टन्स) उजनीतून भीमा नदीत पिण्यासाठी पाणी सोडणे अत्यंत गरजेचे व आवश्यक आहे हे जाणून  जलसंपदा मंत्री नामदार विखे पाटील  यांना पत्र तयार केले असून त्यावरती पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी देखील सही केलेली आहे व हे पत्र तातडीने जलसंपदा मंत्री महोदयांच्याकडे रवाना केले आहे.  धरणातून भीमा नदीत पाच ते सहा टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन तयार असून  जलसंपदा मंत्री महोदयांच्याकडून  परवानगी येताच, सोलापूर जलसंपदा विभागास आदेश देऊन तातडीने कदाचित  बुधवारी किंवा परवा गुरुवारी देखील भीमा नदीत पाणी सोडले जाईल हे निश्चित....
             एस. कार्तिकेयन्
       जिल्हाधिकारी सोलापूर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages