सीना माढा सिंचन योजना यापुढेही चालू ठेवण्यास व भीमा नदीत पाणी सोडण्यास जलसंपदा व पालकमंत्री सकारात्मक...
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यासह माढा तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून नागरिक व पशुधनासाठी पिण्याचे पाणी मिळावे व यापुढे रब्बी हंगामासाठी शेतीला पाणी मिळावे यासाठी सीना माढा सिंचन योजना पुढे चालू ठेवण्यात यावी तसेच उजनीतून भीमा नदीत तातडीने पाणी सोडून सर्व बंधारे भरून घ्यावेत अशी मागणी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा माढा तालुका भाजपाचे युवा नेते रणजीत सिंह शिंदे यांनी मुंबई येथे सह्याद्री अतिथी ग्रहावर झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे केली. पाण्याचे दुर्भिक्ष व गंभीर परिस्थिती विषयी तातडीने सकारात्मक कारवाई करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री महोदयांनी प्रशासकीय विभागास दिले , याप्रसंगी माजी आमदार बबनदादा शिंदे देखील उपस्थित होते.
रणजीत शिंदे यांनी मंत्री महोदयांना माहिती दिली की मागील खरीप हंगामात सीना माढा सिंचन योजना अनेक कारणास्तव संथ गतीने चालू राहिली, अनेक भागात लिकेजेस् झाले आहेत, अनेक ठिकाणी जॉईंट वॉल्स् ना गळती लागलेली आहे, मोटारींच्या फुटबॉल वरती पाण्याचे प्रेशर कमी होत असल्यामुळे पूर्ण क्षमतेने डिलिव्हरी चेंबर पर्यंत पाणी पोहोचू शकत नाही व त्यामुळे लाभक्षेत्रातील अनेक गावांना या हंगामात पाणी पोहोचू शकले नाही तसेच या योजनेवर अवलंबून असलेले ओढे, तळी, लहान बंधारे भरून घेणे देखील अद्याप बाकी राहिले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतात उभी असलेली ऊस फळबागा व चारावैरणीची पिके पाण्याअभावी जळून गेली आहेत तसेच नागरिक व पशुधनाला पिण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. या सर्व परिस्थितीत सीना माढा सिंचन योजना पाण्यासाठी व पुढील रब्बी हंगामातील पिके व चारावैरनीची पिके जगण्यासाठी कायमस्वरूपी चालू ठेवणे आवश्यक आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जलसंपदा मंत्री महोदय विखे पाटील यांनी सकारात्मकता दर्शवून संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिले असल्याचे रणजीत शिंदे यांनी सांगितले.
...। याचप्रमाणे उजनीतून भीमा नदीत पाणी सोडणे बंद होऊन दीन महिना होऊन गेले आहेत,तसेच पावसाचा पत्ता नसल्यामुळे भीमा नदीतील बंधारे कोरडे पडले आहेत ,नदी काठावरील अनेक गावे व वाड्यावस्त्यावरील पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत, शेतात उभी असलेली पिके जगण्यासाठी शेतकऱ्यांची कशीबशी धडपड चालू आहे, या सर्व कारणामुळे भीमा नदीय तातडीने पाणी सोडले पाहिजे असे मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले असत नामदार विखे पाटील यांनी जलसंपदा प्रशासकीय विभागा चे अधिकारी व सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले असल्याचे रणजीत शिंदे यांनी सांगितले.
चौकट.... तर 38 ते 40 गावात पाण्याचे टँकर सुरू करावे लागतील..
सीना माढा सिंचन योजना अनेक कारणामुळे संथगतीने चालत असल्यामुळे लाभक्षेत्रात सर्वत्र पाणी पोहोचले नाही, तसेच पिण्यासाठी पाणी मिळणे आवश्यक असल्यामुळे ही योजना यापुढेही चालू न ठेवल्यास या योजनेवर अवलंबून असलेल्या 38 ते 40 गावात पाण्याचे टँकर सुरू करावे लागतील अशी गंभीर परिस्थिती निर्माण होईल..
रणजीत शिंदे
चौकट ...पालकमंत्र्यांची भेट ...
यानंतर रणजीत शिंदे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची भेट घेऊन त्यांनाही वस्तुस्थितीची कल्पना दिली असता त्यांनी सीना माढा सिंचन योजना यापुढेही पिण्याच्या पाण्यासाठी आणि रब्बी हंगामातील पिके जगवण्यासाठी चालूच राहील व तसेच येत्या एक-दोन दिवसाच्या आत उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले जाईल व सगळे बंधारे भरून घेतले जातील असे नामदार जयकुमार गोरे यांनी शिंदे यांना आश्वासित कले. |

No comments:
Post a Comment