विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, योग व स्वच्छता अभियानाचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 1, 2026

विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, योग व स्वच्छता अभियानाचे आयोजन

 विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, योग व स्वच्छता अभियानाचे आयोजन


सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर यांच्यामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक तसेच जनजागृतीपर विविध कार्यक्रम घेण्यात आले.

दि. 17 सप्टेंबर रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर कार्यालयामार्फत विभागाच्या विविध योजनांची माहिती देणारा चित्ररथ तयार करून प्रकल्प कार्यालय, सोलापूर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पार्क चौक, सोलापूर आणि तेथून पुन्हा प्रकल्प कार्यालयापर्यंत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले.

तसेच आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, सोलापूर; आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, सोलापूर; आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, बार्शी; आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, धाराशिव; 50 आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, धाराशिव आणि आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, कळंब या सहा शासकीय वसतिगृहांमध्ये चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा तसेच स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमध्ये वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

दि. 21 सप्टेंबर रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, होटगी (ता. दक्षिण सोलापूर), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, सवतगव्हाण (ता. माळशिरस), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, वरुडा (जि. धाराशिव), अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, वैराग (ता. बार्शी) आणि अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, मोहा (ता. कळंब) तसेच संबंधित शासकीय व अनुदानित आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहांमध्ये ‘आदिवासी क्रांतिकारकांचे चरित्र व शौर्यगाथा’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

दि. 22 सप्टेंबर रोजी शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत विविध जातींच्या एकूण 70 वृक्षांची लागवड विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आदिवासी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले.

दि. 23 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमात एकूण 268 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यासोबतच शाळा व वसतिगृहांच्या ठिकाणी व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली. जनकल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी कला पथक व नाट्यपथकाच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रमही घेण्यात आले.

दि. 24 सप्टेंबर रोजी शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी योग शिबिर व ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले.

दि. 25 सप्टेंबर रोजी सेवा संकल्प अभियानांतर्गत प्रकल्प कार्यालय, शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये हुतात्मा नाग्या कातकरी जयंती साजरी करण्यात आली.

दि. 28 सप्टेंबर रोजी शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी समाजातील विद्यार्थी व नागरिकांमध्ये शासकीय योजनांची माहिती, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूरचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages