योगासन स्पर्धेत प्रणिती खिलारे, तनुजा लोखंडे प्रथम, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 6, 2026

योगासन स्पर्धेत प्रणिती खिलारे, तनुजा लोखंडे प्रथम, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

 योगासन स्पर्धेत प्रणिती खिलारे, तनुजा लोखंडे प्रथम, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड






नातेपुते (कटूसत्य वृत्त):- महा किड्स, नातेपुते येथे ३ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय, नातेपुतेच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील प्रणिती खिलारे आणि इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील तनुजा लोखंडे यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळविला. या यशामुळे दोन्ही विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील, संस्थेचे मार्गदर्शक डॉ. धवलसिंह  प्रतापसिंह मोहिते-पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष, मार्गदर्शिका उर्वशीराजे मोहिते-पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवानराव साळुंखे तसेच ज्युनियर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. बी. टी. वाघमोडे यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थिनींना प्रा. नारायण माने यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल महाविद्यालय परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages