कल्याणशेट्टी प्रशालेतील विद्यार्थ्याची पुणे येथील विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने पंढरपूर येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कुमार सिद्धाराम भोजण्णा जमादार हा विद्यार्थी 14 वर्षाखालील वयोगटातून 100 व 200 मीटर धावणे या दोन्ही स्पर्धेत जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला असून आता त्याची विभागीय क्रीडा स्पर्धेत निवड झालेली आहे. त्याच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी कामगिरीबद्दल तालुक्यातील ग्रामीण भागातून कौतुक होत आहे. सिद्धाराम जमादार हा विद्यार्थी हसापूर सारख्या ग्रामीण भागातून आलेला अतिशय गरीब कुटुंबातील असून आई-वडिलांचे आशीर्वाद व क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन याबरोबरच रोज मैदानावर खेळणे, सातत्याने सराव करणे तसेच खेळाविषयी आवड, जिद्द, चिकाटी यामुळे तो यशस्वी झाल्याचे सांगितला.
यशस्वी विद्यार्थ्यास क्रीडाशिक्षक कुमार जाधव व श्रीशैल किणगे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे.
यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, संस्थेचे संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संस्थेच्या संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, संचालक मल्लिकार्जुन मसुती, ज्युनिअर विभाग प्रमुख पूनम कोकळगी, सेमी विभागप्रमुख रूपाली शहा, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, दिगंबर जगताप यांनी अभिनंदन केले आहे.
.png)
No comments:
Post a Comment