छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना इतर कोणाशीही खपवून घेणार नाही ! – उमेश कोकरे
शिवरायांच्या सन्मानाशी तडजोड नाही!
शिवरायांना RSS नेते हेडगेवार-गोळवलकरांच्या पंक्तीत;
पुण्यात तीव्र विरोध करत निषेध केला.
शिवरायांच्या इतिहासाचा अवमान खपवून घेणार नाही...
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांच्याशी करण्याच्या कथित प्रयत्नाचा युवा नेते उमेश कोकरे यांनी तीव्र निषेध केला आहे. छत्रपती शिवरायांचे अतुलनीय कर्तृत्व, स्वराज्याची संकल्पना आणि इतिहास यांची तुलना इतर कोणाशीही होऊ शकत नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या इतिहासाचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या विचारधारेचा अवमान करणारे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही कोकरे यांनी दिला. शिवरायांच्या कार्याची महती समजून न घेता त्यांची तुलना अन्य व्यक्तींशी करण्याचा प्रयत्न करणे अनुचित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिवश्री राहुल येलगुंडे, तुषारजी खुटे, सामाजिक कार्यकर्ते अशोक आंधळे, सत्यमजी जाधव, शुभमजी लाहोट, अक्षयजी घोडके यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाचा आणि स्वराज्याच्या विचारांचा मुद्दा उपस्थित करत या सर्वांनी निषेधाच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला.

No comments:
Post a Comment