सागर सिमेंट्सच्या 'पीपीसी सुपर सिमेंट रिटेलर स्कीम'चा बक्षीस वितरण समारंभ थाटात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 5, 2026

सागर सिमेंट्सच्या 'पीपीसी सुपर सिमेंट रिटेलर स्कीम'चा बक्षीस वितरण समारंभ थाटात संपन्न

 सागर सिमेंट्सच्या 'पीपीसी सुपर सिमेंट रिटेलर स्कीम'चा बक्षीस वितरण समारंभ थाटात संपन्न




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नामांकित सिमेंट उत्पादक कंपनी सागर सिमेंट्स लिमिटेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्ष २०२५-२६ च्या 'पीपीसी सुपर सिमेंट रिटेलर स्कीम'चा (PPC Super Cement Retailer Scheme) भव्य बक्षीस वितरण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. कंपनीच्या व्यवसाय वृद्धीत मोलाचे योगदान देणाऱ्या रिटेलर्स आणि डीलर्सचा गौरव करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या समारंभाला सागर सिमेंट्सचे महाराष्ट्र राज्य स्टेट हेड श्री महादेव कोगनुरे, कंपनी मार्केटिंग अधिकारी, डीलर्स, आणि मोठ्या संख्येने रिटेलर बांधव उपस्थित होते.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रिटेलर्सचा सन्मान

वर्षभरात सागर पीपीसी सुपर सिमेंटची विक्रमी विक्री करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रिटेलर्सना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये भाग्यवान विजेत्यांना इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर गृहोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले.

रिटेलर्स हे कंपनीचे बलस्थान

कार्यक्रमात बोलताना सागर सिमेंट्स महाराष्ट्र राज्य स्टेट हेड  श्री महादेव कोगनुरे यांनी सर्व रिटेलर्सचे आभार मानले. "ग्राहकांपर्यंत उच्च दर्जाचे सिमेंट पोहोचवण्यात आणि सागर सिमेंट्सला घराघरांमध्ये लोकप्रिय करण्यात आमच्या रिटेलर्सचा सर्वात मोठा वाटा आहे. रिटेलर्स हेच कंपनीचे खरे बलस्थान असून, त्यांच्या पाठीशी कंपनी नेहमी खंबीरपणे उभी राहील," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

रिटेलर्सकडून आनंद व्यक्त

कंपनीकडून मिळालेल्या या सन्मानामुळे उपस्थित रिटेलर्सनी अत्यंत आनंद व्यक्त केला. सागर सिमेंटच्या दर्जेदार गुणवत्तेमुळे ग्राहकांचा या ब्रँडवर मोठा विश्वास असून, आगामी काळातही कंपनीसोबतचे व्यावसायिक संबंध अधिक दृढ करू, अशी प्रतिक्रिया विजेत्या रिटेलर्सनी दिली.

मनोरंजक कार्यक्रम आणि स्नेहभोजनाने या सोहळ्याची सांगता झाली

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages