नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देणे हीच नानांना खरी श्रद्धांजली : अक्षय भांड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 5, 2026

नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देणे हीच नानांना खरी श्रद्धांजली : अक्षय भांड

 नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देणे हीच नानांना खरी श्रद्धांजली : अक्षय भांड




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती स्व. चंद्रशेखर (नाना) भांड यांच्या स्मृतीदिनानिमित्त अक्षय दादा भांड मित्र परिवाराच्या वतीने नातेपुते शहरात दोन दिवसीय व्यापक स्वच्छता व जंतुनाशक फवारणी मोहीम राबविण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक तसेच धनगर गल्ली परिसरातील प्रभाग क्रमांक १५ व १६ मध्ये स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर परिसरात जंतुनाशक फवारणी करून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली.
यावेळी अक्षय भांड म्हणाले, “स्व. चंद्रशेखर नाना भांड यांनी समाजसेवा, लोककल्याण आणि शहराच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या सेवाभावी विचारांचा वारसा पुढे नेत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि शहर स्वच्छ व निरोगी ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.”
या उपक्रमाला नागरिक व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती मणून नवनाथ ठोंबरे, डॉ. नरेंद्र कवितके, डॉ. संदिप महामुनी, नंदकिशोर धालपे, गणेश कुचेकर, मयूर पाडसे, सुरज चांगण, दादा लाळगे, शंकर डफळ, चंद्रकांत तात्या ठोंबरे, सुनिल ढोबरे, अशोक राऊत, प्रशांत ठोंबरे, पिंटू भगत महाराज, दिलीप लाळगे, ढवळे सर, वैभव शहा, किरण कुलकर्णी, नितीन बडवे, विनायक उराडे, संजय मामा उराडे, अकबर शेख, शेखर पिसे, गणेश राऊत, डॉ. विशाल दोशी, संदिप दळवी, लखन दळवी, सुनिल ढोबळे, भागवत काळे, अर्जुन पिसाळ, बाळू भांड, वैभव लाळगे, संदिप चांगण, किशोर दगडे, दिलीप सावळकर, धनराज डफळ, रियाज शेख, दादा अटक, प्रथमेश पांढरे, विशाल भरते, किरण काटकर तसेच अक्षय दादा भांड मित्र परिवारातील कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages