सेवा संकल्प अभियानांतर्गत आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये स्वच्छता अभियान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 5, 2026

सेवा संकल्प अभियानांतर्गत आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये स्वच्छता अभियान

 सेवा संकल्प अभियानांतर्गत आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये स्वच्छता अभियान






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर अंतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहांमध्ये स्वच्छ, सुंदर, निरोगी व सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

दि. २ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत दि. ३ ऑक्टोबर रोजी प्रकल्प कार्यालय, तसेच अधिनस्त ३ शासकीय आश्रमशाळा, २ अनुदानित आश्रमशाळा व ६ शासकीय वसतिगृहांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान कार्यालय, शाळा व वसतिगृह परिसरातील कचरा, दगड, अनावश्यक झुडपे व इतर अनावश्यक साहित्य हटविण्यात आले. तसेच प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते, प्रांगण व सभोवतालच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.

विद्यार्थ्यांना स्वच्छ, निरोगी व सुरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेबाबत जनजागृती आणि स्वच्छतेची सवय निर्माण करण्याच्या उद्देशाने अभियानातील विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

हे अभियान प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, प्रकल्प कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, आश्रमशाळा व वसतिगृहातील कर्मचारी आणि संबंधितांनी अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages