सोलापूर शहरातील दररोज १२० रनिंग किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 9, 2026

सोलापूर शहरातील दररोज १२० रनिंग किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता

 सोलापूर शहरातील दररोज १२० रनिंग किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता




सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेस शासनाकडून प्राप्त झालेल्या ४ यांत्रिकी स्वच्छता वाहनांद्वारे शहरातील दररोज सुमारे १२० रनिंग किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता करण्याचे कामकाज सुरू आहे. यामुळे शहरातील प्रमुख रस्ते स्वच्छ व धुळमुक्त ठेवण्यास मदत होत आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी मा. पालकमंत्री श्री. जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते तसेच माननीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सदर यांत्रिकी स्वच्छता वाहनांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

सदर वाहने नवीन असल्याने व शासनाच्या अटी व शर्तींनुसार सदर यांत्रिकी स्वच्छता वाहनांच्या माध्यमातून एक महिन्याचे प्रशिक्षण रात्रीच्या सत्रात देण्यात आले. प्रशिक्षणाच्या कालावधीसोबतच स्वच्छतेचे कामकाजही सुरू करण्यात आले. प्रत्येक यांत्रिकी स्वच्छता वाहनाद्वारे प्रत्येक शिफ्टमध्ये सरासरी ३० रनिंग किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यांत्रिकी स्वच्छतेसोबतच सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या पाण्याच्या टँकरच्या माध्यमातून मुख्य रस्त्यांवरील फुटपाथ व डिव्हायडर यांची प्रेशरयुक्त पाण्याने स्वच्छता करण्याचे कामही करण्यात येत आहे.

सदर यांत्रिकी स्वच्छतेचे काम रात्री १०.०० ते सकाळी ६.०० या कालावधीत करण्यात येत आहे. शहरातील विविध प्रमुख रस्ते, चौक व परिसरांमध्ये टप्प्याटप्प्याने हे कामकाज करण्यात येणार आहे.

यामध्ये खालील प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे :
अशोक चौक, गुरुनानक चौक, पत्रकार भवन चौक, मोदी पोलीस चौक, सिव्हिल चौक, पोटफाडी चौक, शिवराम चौक, डब्ल्यूआयटी चौक, कर्णिक नगर रिक्षा कॉर्नर, वालचंद कॉलेज परिसर, मुनोत टेक्स्टाईल परिसर, ७० फूट चौक, आकाशवाणी केंद्र, विनायक नगर, जुना कुंभारी नाका परिसर, ईआरटी चौक परिसर, एमआयडीसी पोस्ट ऑफिस परिसर, सत्यम चौक, साईबाबा चौक, ७० फूट रोड, कुमठा नाका परिसर, बी वाय चौक, राजेंद्र चौक, शांती चौक, प्रियंका चौक, रूपाभवानी चौक, दयानंद कॉलेज परिसर, बलिदान चौक, कस्तुरबा मार्केट, जोडभावी पेठ, शिवाजी चौक, बाळवेस, कोंतम चौक, कन्ना चौक, भुलाबाई चौक, नई जिंदगी परिसर, रुद्रमणी चौक, विजापूर रोड, सैफुल चौक, पत्ता नगर चौक, नवीन आरटीओ परिसर, अशोक नगर, रंगभवन चौक, स्ट्रीट बाजार, पासपोर्ट कार्यालय परिसर, शुभराय आर्ट गॅलरी, पटवर्धन चौक, लकी चौक, हिराचंद नेमचंद वाचनालय, सरस्वती चौक, रामलाल चौक, मरीआई चौक, देगाव परिसर, इत्यादी.

सदर स्वच्छता कामकाज सुरू असताना माननीय लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच विविध सेवाभावी संस्था प्रत्यक्ष भेट देऊन सोलापूर महानगरपालिकेच्या या उपक्रमास प्रोत्साहन देत आहेत.

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, यांत्रिकी स्वच्छतेचे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी वरील परिसरातील रस्त्यांच्या कडेला वाहने पार्क करू नयेत तसेच रस्त्यावर कोणत्याही प्रकारच्या वस्तू ठेवून स्वच्छता कामात अडथळा निर्माण करू नये.

नागरिकांच्या सहकार्यामुळे यांत्रिकी स्वच्छतेचे काम अधिक प्रभावीपणे व नियोजित पद्धतीने पूर्ण करता येईल आणि शहरातील रस्ते स्वच्छ व धुळमुक्त ठेवण्याच्या महानगरपालिकेच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages