श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचे नारीशक्ती पुरस्कार जाहीर !
शनिवारी वितरण सोहळा : नऊ महिलांचा होणार गौरव
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर नऊ महिलांना "नारीशक्ती" पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवार दि. १० ऑक्टोंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांनी दिली.
रूपाभवानी चौकाजवळील हुतात्मा श्रीकिसन सारडा स्मारक सभागृह येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या संस्थापिका स्वाती शहा, एमआयटीच्या प्रा.वंदना कोपकर, सोलापूर जिल्हा बालरंग भूमी परिषदेच्या अध्यक्षा सीमा यलगुलवार, समर्थ होमिओपॅथिक क्लिनिकच्या डॉ. गौरी बाचल, इनरव्हिल क्लब ऑफ सोलापूर हार्मोनीचे अध्यक्ष नेहा राठी, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे सातवे वर्ष आहे. नवरात्रीनिमित्त आदिशक्तीच्या नऊ रूपाप्रमाणेच विविध क्षेत्रातील नऊ महिलांचा नारीशक्ती पुरस्काराने सन्मान होणार असल्याचे महेश कासट यांनी सांगितले. या सोहळ्यास सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन शुभांगी लचके, भारती जवळे, रंजना ढेगले, नर्मदा कनकी, शीला तापडिया, रुपा कुत्ताते, सुजाता सक्करगी, अक्षता कासट, प्रगती तिवारी यानी केले आहे.
■चौकट ---
या आहेत नारीशक्ती पुरस्काराच्या मानकरी
मिनाक्षी रामपुरे (कला क्षेत्र), उद्योजिका स्नेहा मकरीये (उद्योग), अमर ज्योती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्षा वंदना गाडे (सामाजिक), आर्यन्स युनिक प्रीस्कूलच्या चेअरमन गौरी जोग (व्यवस्थापन), डॉ.सिमा तापडिया (वैद्यकीय), एलआयसी ब्रँच मॅनेजर प्रिती विहिरे (विमा क्षेत्र), नर्स रुमाना शेख (आरोग्य), झेडपी शाळा शिक्षिका भुमिका क्षीरसागर (शिक्षण), मनपा बालवाडी शिक्षिका रामेश्वरी बेरुनगी (बाल संस्कार) आदी नऊ मान्यवर महिलांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment