मार्डीत शहीद भगतसिंग यांची जयंती उत्साहात साजरी
उत्तर सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मार्डी येथे निर्मल हृदय दादा युवा प्रतिष्ठान आणि संत वीरशैव कक्कय्या समाज प्रबोधन मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद भगतसिंग यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
माजी सैनिक मेजर मारुती जाधव आणि मेजर लक्ष्मण राठोड यांच्या हस्ते भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख होते.
यावेळी मेजर मारुती जाधव म्हणाले, पंजाबमध्ये आजही भगतसिंग यांच्याबद्दल सामान्य नागरिकांच्या मनात मोठी श्रद्धा आहे. त्यांच्या स्मृती आणि देशसेवेच्या कार्यातून प्रेरणा घेऊन अनेक युवक सैन्यात दाखल होत आहेत. शहीद स्वातंत्र्यसैनिकांबद्दल प्रत्येकाच्या मनात आदराची भावना असणे गरजेचे आहे.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय खरटमल यांनी माजी सैनिक मेजर मारुती जाधव आणि मेजर लक्ष्मण राठोड यांचा सत्कार केला.
कार्यक्रमास शिवाजीराव सोनार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री विष्णू जगताप, प्रशांत काशिद, पोपट साठे, आबा काटे, भीमाशंकर नारायणकर, अशोक नारायणकर, चंद्रकांत नारायणकर, योगेश नारायणकर, मोतीराम नारायणकर आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment