दक्षिण सोलापूर तालुक्यात चौथी व सातवी शिष्यवृत्ती कार्यशाळेला उत्स्फूर्त सुरुवात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 7, 2026

दक्षिण सोलापूर तालुक्यात चौथी व सातवी शिष्यवृत्ती कार्यशाळेला उत्स्फूर्त सुरुवात

 दक्षिण सोलापूर तालुक्यात चौथी व सातवी शिष्यवृत्ती कार्यशाळेला उत्स्फूर्त सुरुवात





दक्षिण सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पंचायत समिती दक्षिण सोलापूरच्या शिक्षण विभागाच्या वतीने इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२७ च्या तयारीसाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेला तालुक्यातील शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सक्षमपणे तयार करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
इयत्ता चौथीच्या शिक्षकांसाठी लोकसेवा हायस्कूल, मंद्रूप येथे, तर इयत्ता सातवीच्या शिक्षकांसाठी मार्कंडेय हायस्कूल, कुंभारी येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मंद्रूप पगार बीट अंतर्गत सहा केंद्रांतील इयत्ता चौथीचे शिक्षक या कार्यशाळेस उपस्थित होते.
या कार्यशाळेस गटविकास अधिकारी मा. श्री. मनोज राऊत साहेब यांनी भेट देऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व, विद्यार्थ्यांची योग्य तयारी, नियमित सराव, प्रश्नपत्रिका सोडविण्याची पद्धत तसेच विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेविषयी आत्मविश्वास निर्माण करण्याबाबत मार्गदर्शन केले.
शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी पात्र व्हावेत, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची प्रभावी तयारी करता यावी, हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी विषयतज्ज्ञ व मार्गदर्शक शिक्षकांच्या माध्यमातून मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता व शंका समाधान या घटकांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे.
या उपक्रमामुळे शिक्षकांना अध्यापनाच्या प्रभावी पद्धती, प्रश्नांचा सराव आणि विद्यार्थ्यांची परीक्षाभिमुख तयारी याबाबत दिशा मिळत असून, दक्षिण सोलापूर तालुक्याचा शिष्यवृत्ती परीक्षेतील निकाल उंचावण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages