शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 2, 2026

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे श्रीकांत शिंदे यांची मागणी
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 51 हजार रूपयांची मदत


पंढरपूर-(कटूसत्य वृत्त):-   महायुती सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर शैक्षणिक फी माफ केलेलीच आहे परंतु खऱ्या अर्थाने शेतकरी कुटुंबाला जर आधार द्यायचा असेल तर शैक्षणिक फी माफ करून शेतकऱ्यांना मोठा आधार भेटेल कारण परीक्षा शुल्क हे कमी असते आणि शैक्षणिक फीही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना भरणे जिकिरीचे होऊन जाते अशावेळी ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न आठ लाख रुपये च्या आत आहे अशा शेतकऱ्यांच्या मुलांना व मुलींना शैक्षणिक फी मधून  सवलत मिळावी अशी मागणी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी  निवेदनाद्वारे केली आहे. सुनेत्रा वहिनी यांनी येत्या काळात नक्कीच याबद्दल सकारात्मक विचार आपलं महायुती सरकार करेल असा आशावाद वहिनींनी बोलून दाखवला. तसेच “अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा” — दादांची हीच शिकवण मनात ठेवून, नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावश्यक खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस व अजितदादा फाउंडेशन पंढरपूर यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ₹५१,०००/- चा धनादेश उपमुख्यमंत्री मा ना श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. दादांची शिकवण… समाजासाठी मदतीचा हात… आणि माणुसकी जपण्याचा हा छोटासा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी आमदार विजयसिंह पंडीत, उद्योजक ओम साई इंडस्ट्रीजचे मालक संदीप दादा गावडे, श्री डॉ प्रा आडल सर, दत्ता गवळी उपस्थित होते...
या निवेदनात असे म्हटले आहे की,

कारण शेतकऱ्याच्या मुलाच्या हातात पुस्तक आले, तर त्या कुटुंबाच्या भविष्यात आशेचा किरण निर्माण होतो. पैशाअभावी कोणत्याही शेतकऱ्याच्या मुलाचे शिक्षण थांबू नये, यासाठी शासनाने हा निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी घेतलेला हा निर्णय त्यांच्या भवितव्याला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास आहे. आपण या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages