उपयुक्तता आणि सौंदर्यदृष्टीचा संगम साधत वास्तूचे वैशिष्ट्य जपावे – सभापती प्रा. राम शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 10, 2026

उपयुक्तता आणि सौंदर्यदृष्टीचा संगम साधत वास्तूचे वैशिष्ट्य जपावे – सभापती प्रा. राम शिंदे

 

उपयुक्तता आणि सौंदर्यदृष्टीचा संगम साधत वास्तूचे वैशिष्ट्य जपावे – सभापती प्रा. राम शिंदे



मुंबई(कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी महाराष्ट्र विधानमंडळानजीकच्या नूतन मनोरा आमदार निवासाच्या सुरु असलेल्या बांधकामाची पाहणी केली. हे बांधकाम वेगाने प्रगतीपथावर असून ‘अ’ आणि ‘ब’ असे इमारतीचे दोन्ही मनोरे सर्व सुसज्ज सोयी सुविधांसह फेब्रुवारी, 2028 पूर्वी आमदारांच्या सेवेत येणार आहेत. ‘अ’ मनोऱ्याचे सर्व 29 मजले बांधून पूर्ण झाले असून ‘ब’ मनोऱ्याचे 42 पैकी 34 मजले पूर्ण झाले आहेत. सभापती प्रा. शिंदे यांनी यावेळी सर्व संबंधितांना उपयुक्तता आणि सौंदर्यदृष्टीचा संगम साधत वास्तूचे वैशिष्ट्य जपण्यात यावे, काळजीपूर्वक वापर व्हावा यादृष्टीने नियमावली सुनिश्चित करण्यात यावी, तसेच अगोदरच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन व्हावे, असे निर्देश दिले.

सर्व सन्माननीय सदस्य तसेच त्यांचे स्वीय सहायक, अभ्यागत, कार्यालय यादृष्टीने एकत्रित असा सुसज्ज निवासी कक्ष या नूतन मनोरा आमदार निवासमध्ये तयार करण्यात येत आहे. उपहारगृहे, पार्किंग, बैठक कक्ष इत्यादी सुविधा असणार आहेत. या पाहणी प्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-1 जितेंद्र भोळे, सचिव-4 शिवदर्शन साठ्ये, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता, प्रज्ञा वाळके, कार्यकारी अभियंता विद्याधर पाटसकर, वास्तुविशारद अतुल प्रभू, प्रकल्प व्यवस्थापक(एल ॲण्ड टी) सतिश राघवन, प्रकल्प सल्लागार फोट्रेस इन्फ्राकॉमचे श्री. कैलास आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages