‘सजगता आणि काळजी’ हीच सायबर गुन्ह्यांपासून बचावाची गुरुकिल्ली ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 26, 2026

‘सजगता आणि काळजी’ हीच सायबर गुन्ह्यांपासून बचावाची गुरुकिल्ली !

 ‘सजगता आणि काळजी’ हीच सायबर गुन्ह्यांपासून बचावाची गुरुकिल्ली !

पत्रकारांच्या कार्यशाळेत सायबर तज्ञांचे मत



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सोलापूर शहर पोलिस दल सातत्याने प्रयत्नशील आहेत. ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, ओटीपीची मागणी, सोशल मीडिया फसवणूक अशा सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा. आपली वैयक्तिक व आर्थिक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका. तंत्रज्ञानाचा वापर करताना सजगता आणि सुरक्षितता बाळगणे हीच सायबर गुन्ह्यांपासून बचावाची गुरुकिल्ली असल्याचे सायबर तज्ञांनी सांगितले. यावेळी सोलापूर शहरातील ८० पत्रकार बांधव सहभागी झाले होते.

सोलापूर शहर पोलिस आयुक्तालय व क्राइम पत्रकार संघाच्यावतीने शनिवारी पोलिस आयुक्तालयात पत्रकारांसाठी सायबर गुन्ह्यासंदर्भातील कार्यशाळा पार पडली. यावेळी पोलिस उपायुक्त (गुन्हे) अश्विनी पाटील, पोलिस उपायुक्त (परिमंडल) प्रितम यावलकर, सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने व क्राइम पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल भांगे यांच्यासह आदी पेालिस अधिकारी, कर्मचारी व पत्रकार बांधव उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक व स्वागत सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे यानी केले. कार्यशाळेत सहभागी पत्रकारांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

‘अनोळखी क्रमांकावरून येणारे मेसेज, संशयास्पद लिंक्स किंवा व्हॉट्सॲपवर येणाऱ्या अनधिकृत गोष्टींवर क्लिक करू नका. एका क्लिकमुळे तुमच्या संपूर्ण मोबाईलचा ताबा सायबर गुन्हेगारांकडे जाऊ शकतो. बँक खात्यांची माहिती, छायाचित्रे आधारकार्डसारखी ओळखपत्रे सायबर गुन्हेगारांच्या हाती लागल्यास त्याचा गैरवापर करून बनावट खाती सुरू केली जातात आर्थिक फसवणूक केली जाते.’ त्यांनी पुढे डिजिटल अरेस्ट, बनावट पोलिस अधिकारी बनून धमकावणे, शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली होणारी कोट्यवधी रुपयांची फसवणूक, गॅस बिल भरण्याचे खोटे मेसेज आणि इन्स्टंट लोन ॲप्सच्या माध्यमातून होणारे ब्लॅकमेलिंग याविषयी घडलेल्या प्रत्यक्ष घटनांची उदाहरणे देऊन सायबर तज्ञ अविनाश पाटील व महिला पोलीस अंमलदार प्रांजली काळे यांनी माहिती दिली. या कार्यक्रमास क्राइम पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, सोलापूर विद्यापीठ मास कम्युनिकेशन विभागातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. आभार इम्रान सगरी यांनी मानले.

-----------
फसवणूक झाल्यास '१९३० किंवा १९४५ वर संपर्क साधा
कोणत्याही प्रकारची सायबर किंवा आर्थिक फसवणूक झाल्यास नागरिकांनी अजिबात वेळ न दवडता तत्काळ शासनाच्या १९३०, १९४५ या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा थेट सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क करावा, जेणेकरून खात्यातून गेलेली रक्कम तत्काळ गोठवून (फ्रीझ करून) वाचवता येऊ शकेल, असेही पोलिस उपायुक्त (गुन्हे) अश्विनी पाटील यांनी स्पष्ट केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages