शिवसेना गटनेते अमोल शिंदे डीसीसी बँकेच्या मैदानात; नागरी पतसंस्था मतदारसंघातून अर्ज दाखल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 30, 2026

शिवसेना गटनेते अमोल शिंदे डीसीसी बँकेच्या मैदानात; नागरी पतसंस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

शिवसेना गटनेते अमोल शिंदे डीसीसी बँकेच्या मैदानात; नागरी पतसंस्था मतदारसंघातून अर्ज दाखल



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) निवडणुकीत आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे महानगरपालिकेतील गटनेते अमोल शिंदे यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका व नागरी सहकारी पतसंस्था या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांच्याकडे दाखल केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत बाबर उपस्थित होते. विविध राजकीय पक्षांतील नेत्यांच्या उपस्थितीमुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, यापूर्वी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनीही इतर मागासवर्ग प्रवर्गातील सदस्य या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अमोल शिंदे उपस्थित होते.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी विविध मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल होत असून, आगामी काळात या निवडणुकीतील राजकीय समीकरणे कशी आकार घेतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages