लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचे तीव्र निदर्शने; मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी, दिल्लीतील आंदोलनकर्त्या महिला व तरुणांवर झालेल्या मोदी सरकारच्या अत्याचारांच्या निषेधार्थ, तसेच मतचोरीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारच्या विरोधात आणि सोलापुरात भाजपने केलेल्या आंदोलनाला काँग्रेसने ‘स्टंटबाजी व नौटंकी’ संबोधत केलेल्या निषेधार्थ खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा परिषद पूनम गेट येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला.
यावेळी बोलताना शहर काँग्रेस अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी, तसेच सोलापुरात भाजपने केलेल्या आंदोलनातील दुटप्पीपणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे.
देशात काँग्रेससहित विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसी बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप करत नरोटे म्हणाले की, दिल्लीतील आंदोलन रोखण्यासाठी रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करणे, सीमा सील करणे, आणि दडफशाही करून, मारहाण करून आंदोलकांना ताब्यात घेणे, अशा घटनांमुळे देशात लोकशाही आहे की हुकूमशाही, देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
केंद्र सरकार राहुलजी गांधी आणि विरोधकांच्या आंदोलनाला घाबरले आहे का? मतचोरीवर आणि निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी आंदोलकांवर कारवाई का केली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे खासदार आणि विविध विरोधी पक्षांचे नेते लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आले आहेत. निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांबाबत देशभरात आवाज उठवला जात आहे. या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद पाहता भाजपची परतीची वाट सुरू झाले आहे असे नरोटे म्हणाले.
सोलापुरात भाजपने केलेल्या आंदोलनावर टीका करताना काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, भाजपला महिलांच्या सन्मानाची एवढीच काळजी असेल, तर दिल्लीतील आंदोलनादरम्यान महिला व तरुण आंदोलकांवर झालेल्या मोदी सरकारच्या अत्याचारांविरोधात त्यांनी आवाज उठवावा. आंदोलनकर्त्या महिलांना मारहाण करणे, त्यांचे कपडे फाडणे तसेच केस धरून फरफटत नेऊन त्यांना ताब्यात घेणे, या घटना महिला सन्मानाच्या दाव्यांशी विसंगत नाहीत काय? एकीकडे महिला सन्मानाच्या घोषणा द्यायच्या आणि दुसरीकडे मोदी सरकारकडून होत असलेल्या महिलांच्या सन्मानाशी संबंधित गंभीर प्रकरणांवर मौन बाळगायचे, हा भाजपचा दुटप्पीपणा असल्याची टीका नरोटे यांनी केली.
भाजपचे महिला सक्षमीकरणाचे दावे केवळ भाषणे आणि घोषणांपुरते मर्यादित आहेत का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी महिला सन्मानाच्या नावाखाली राजकीय दिखावा करण्याऐवजी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस भूमिका घेण्याचे आवाहन केले. महिला खेळाडूंच्या लैंगिक छळाच्या आरोपांवरून देशभरात आंदोलन झाले होते. तसेच माजी खासदार प्रज्वल रेवण्णा, ब्रिजेशकुमार यांच्यावर महिलांवरील लैंगिक अत्याचारांचे गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणांसह महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांवर भाजपने आत्मपरीक्षण करावे, असेही नरोटे म्हणाले.
महिला सन्मानाच्या नावाखाली राजकीय स्टंटबाजी करण्याऐवजी दिल्लीतील आंदोलक महिलांवरील अत्याचारांविरोधात भाजपने भूमिका स्पष्ट करावी. महिलांच्या हक्कांचे आणि सन्मानाचे राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या न्यायासाठी ठामपणे उभे राहणे महत्त्वाचे आहे. सोलापुरात भाजपने केलेले आंदोलन म्हणजे केवळ राजकीय स्टंटबाजी आणि नौटंकी आहे, अशी घणाघाती टीका चेतनभाऊ नरोटे यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, सोलापूर शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांना आंदोलन करू नये म्हणून पोलिसांकडून नोटिसा बजावल्या जात आहेत. नोटिसा, धमक्या किंवा दडपशाहीच्या माध्यमातून जनतेचा आवाज बंद करता येणार नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवणे हा आमचा घटनात्मक अधिकार आहे. कितीही दडपशाही केली, तरी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच ठेवणार आहोत.
वोट चोरी बंद करा, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्या आणि एसआयआर प्रक्रिया रद्द करा, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असा निर्धार चेतनभाऊ नरोटे यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी महापौर सुशीलाताई आबुटे, प्रदेश सचिव श्रीशैल रणदिरे, कार्याध्यक्ष हणमंतु सायबोळु, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, भटक्या-विमुक्त विभागाचे अध्यक्ष युवराज जाधव, मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष सागर उबाळे, रोजगार-बेरोजगार विभागाचे अध्यक्ष रुपेश गायकवाड, यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक खन्ना, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, विचार विभागाच्या अध्यक्ष ॲड. करीमुन्निसा बागवान, ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड, शिवशंकर आंजनाळकर, परशुराम सतारेवाले, एन. के. मुल्ला, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, सरचिटणीस ॲड. केशव इंगळे, गिरीधर थोरात, गणेश आप्पा नरोटे, शाफी हुंडेकरी, सागर शहा, रमेश फुले, संजय गायकवाड, विवेक इंगळे, भीमराव शिंदे, मोहसीन फुलारी, माजी नगरसेवक प्रा. भोजराज पवार, भारती ईपलपल्ली, माजी महिला अध्यक्ष सुमन जाधव, हेमाताई चिंचोळकर, शोभा बोबे, शुभांगी लिंगराज, मुमताज तांबोळी, ज्योती गायकवाड, संघमित्रा चौधरी, रेखा बिनेकर, अनिता भालेराव, मीना गायकवाड, ऐजाज बागवान, दशरथ सामल, व्यंकटेश बोमेन, काशिनाथ शिरशीकर, शिवाजी साळुंखे, हणमंतु रुपनर, रफिक रामपुरे, पवन सग्गम, विनायक भोसले, चंद्रकांत टिक्के, सुनील डोळसे, मलिक नदाफ, सर शुकुर शेख, अभिलाष अच्युगटला, पंडित बुवा गणेशकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment