वचनपूर्ती बद्दल चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराच्या वतीने महापौरांचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 5, 2026

वचनपूर्ती बद्दल चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराच्या वतीने महापौरांचा सत्कार

 वचनपूर्ती बद्दल चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराच्या वतीने महापौरांचा सत्कार




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै २०२६ रोजी भवानी पेठेतील जय भवानी प्रशालेतील विद्यार्थांना महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते व चौडेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत रामचंद्र उदगिरी यांच्या अध्यक्षतेखाली गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना चन्नवीर चिट्टे यांनी जय भवानी प्रशालेची दुरावस्था महपौरांसमोर मांडून याप्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. शाळेची इमारत जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांनां तोंड द्यावे लागत असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आणून दिले होते. महापौर विनायक कोंड्याल यांनी आपल्या भाषणात यासर्व बाबींचा ऊहापोह करून लवकरात लवकर शाळा दुरुस्ती करण्यासंदर्भात वचन दिले होते. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य ते नियोजन करून त्या सर्वांची सोय करण्यात येईल असा शब्द त्यांनी आपल्या भाषणात दिला होता.
महापौरांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी मनपा आयुक्त डॅा. सचिन ओंबासे व इतर पदाधिकारयांसोबत जय भवानी प्रशालेची पाहणी करून त्याठिकाणी नविन ०८ वर्ग खोल्या बांधण्यात येणार असल्याचे जाहिर करून प्रशासनाला तसा आदेश दिला आणि येणाऱ्या सर्वसाधारण सभेत त्यास मान्यता देण्यात येईल असे जाहिर केले. महापौरांना आपला शब्द पाळला व जय भवानी प्रशालेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला म्हणून चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराच्या वतीने महापालिकेत जावून महापौर विनायक कोंड्याल व पक्षनेते मा. नरेंद्र काळे यांचा सत्कार केला. या सत्काराप्रसंगी बोलताना चन्नवीर चिट्टे यांनी महापौर व मनपा प्रशासनाचे कौतुक करून दिलेला शब्द पाळल्याबद्दल महापौरांचे आभार मानले. यावेळी मित्र परिवाराचे सदस्य नागेश बडदाळ यांच्या वाढदिवसानिमित्त महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार समारंभास चौडेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत रामचंद्र उदगिरी, नागेश ताटी, श्रीनिवास दासरी, गुरूनाथ कोळी, नागेश बडदाळ, साईनाथ सज्जे, परमेश्वर क्षीरसागर, रवि शहापूरकर, सद्दाम कोसगीकर, सोमनाथ कलशेट्टी, नितीन हलसगी , अंबादास पाटील आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages