हर्षदा देशमुख - जाधव आमदार होणार - रावसाहेबकाका पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 21, 2026

हर्षदा देशमुख - जाधव आमदार होणार - रावसाहेबकाका पाटील

 हर्षदा देशमुख - जाधव आमदार होणार - रावसाहेबकाका पाटील

हर्षदा देशमुख - जाधव यांनी राज्याचे नेतृत्व करावे . - सादिक खाटीक



आटपाडी (कटूसत्य वृत्त):-      पुणे पदवीधर मतदार संघातील उमेदवार हर्षदा देशमुख - जाधव याच आमदार होणार आहेत, अशा आशिर्वादात्मक भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील यांनी व्यक्त केल्या . तर हर्षदा देशमुख - जाधव यांनी आमदार झाल्यानंतर एका विभागापुरते मर्यादीत न राहता, राज्यातील पदवीधर, युवक, युवती, विद्याथी यांचे नेतृत्व करावे. अशा अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे नेते सादिक खाटीक यांनी व्यक्त केल्या .
          पुणे पदवीधर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ . हर्षदा देशमुख - जाधव यांनी आज आटपाडी येथे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे राज्याचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील, युवा नेते सुरज पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली . त्यावेळी त्यांचा रावसाहेबकाका पाटील यांच्या हस्ते शाल, बुके देवून सन्मान करणेत आला .
          हर्षदा देशमुख - जाधव आमदार होणारच आहेत, अशा शब्दात सदिच्छा शुभेच्छा देत रावसाहेबकाका पाटील यांनी त्यांना आशिर्वाद दिले . राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार साहेबांसह राज्यातील अनेक नेत्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची नेहमीच दखल घेतल्याचा निर्वाळा देत रावसाहेबकाका पाटील यांनी, आमदार जयंतराव पाटील, आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील सांगली जिल्ह्यात हर्षदा देशमुख - जाधव या मोठे मताधिक्य घेतील आणि मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजयी होतील . अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या .
          स्वागत सुरज पाटील यांनी केले . तर प्रास्ताविक गणेश ऐवळे सर यांनी केले .
          माजी मंत्री सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वात गोकुळ दुध संघातील नेत्रदीपक विजयाने हर्षदा देशमुख - जाधव यांचा विजय अधिक सुकर झाला आहे . पदवीधरांबरोबरच राज्यातील उपेक्षित वंचित समाज घटकांबरोबर हर्षदा देशमुख - जाधव यांनी माणदेशी आमदार म्हणून माणदेशाचे राज्यभर नेतृत्व करावे . त्यांच्या विजयाच्या दणक्याने माण - खटाव सह पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार निवडून यावेत . यासाठी हर्षदाताई देशमुख - जाधव क्षण क्षण वेचतील असा आशावाद सादिक खाटीक यांनी व्यक्त केला .
          या निवडणूकीत मला आटपाडी तालुक्यातील मतदारांनी  आशीर्वाद द्यावा. तुमच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा माझा पुरेपुर प्रयत्न असेल . एकतर्फी होत चाललेली दैनिके व पत्रकार बांधव हा चिंतेचा विषय आहे . लोकशाही आबादीत राहण्यासाठी वृतपत्र सृष्टीतील सर्व घटकांनी निकोप भूमिका घ्यावी . अशी अपेक्षा उमेदवार हर्षदा देशमुख - जाधव यांनी केली .
          यावेळी आटपाडी तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील, राजारामबापू हायस्कुल आटपाडीचे मुख्याध्यापक माणिकराव साळुंखे, माजी मुख्याध्यक टी . डी . चव्हाण सर, न्यु हायस्कुल घरनिकीचे मुख्याध्यापक बाळासाहेब उर्फ एस . एन . चव्हाण , एम . बी . देवकर सर, गणेश ऐवळे सर, राष्ट्रवादी सोशल मिडीयाचे तालुकाध्यक्ष किशोर गायकवाड, युवा नेते नितीन डांगे, विठ्ठलराव गायकवाड इतर अनेक मान्यवर उपस्थित होते . शेवटी गणेश ऐवळे सर यांनी आभार मानले .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages