कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा भाजपकडून साधेपणाने आनंद साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 29, 2026

कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा भाजपकडून साधेपणाने आनंद साजरा

 कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा भाजपकडून साधेपणाने आनंद साजरा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी विजय मिळविल्याबद्दल सोलापूर शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचे भान राखत कोणताही जल्लोष न करता साधेपणाने विजय साजरा करण्यात आला. यावेळी कैलासवासी प. पू. डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
          शिक्षक मतदारसंघातील या विजयाबद्दल शिक्षक बांधव आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास पुष्पार्पण केले. सध्याची दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन विजयाचा आनंद साधेपणाने व्यक्त करण्याचा निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आला होता. त्यानुसार फटाके, मिरवणूक किंवा मोठा जल्लोष न करता अभिवादनातून आनंद व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी सोलापूर शहर भाजपच्या अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, शहर जिल्हा सरचिटणीस सुधाताई अळ्ळीमोरे, नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, सागर अतनूरे, शहर प्रचारप्रमुख व्यंकट राठोड, विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एस. कदम, दक्षिण सोलापूर तालुकाप्रमुख श्रेयस पाटील, क्रीडा शिक्षक संतोष राठोड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages