दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिजिओथेरपी व आरोग्य तपासणी शिबिर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 1, 2026

दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिजिओथेरपी व आरोग्य तपासणी शिबिर

 दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिजिओथेरपी व आरोग्य तपासणी शिबिर

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ तसेच जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिजिओथेरपी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिरामध्ये दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी, आवश्यक उपचार तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना आरोग्याच्या समस्या, शारीरिक हालचालींशी संबंधित अडचणी तसेच फिजिओथेरपीविषयक आवश्यक मार्गदर्शन तज्ज्ञांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हे शिबिर दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून, शिबिराचे स्थळ मनपा शाळा क्रमांक ६, भौतिकोपचार केंद्र, जोड बसवण्णा चौक, सोलापूर हे आहे.
दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages