भाजपाच्या पसंतीला उतरलेले कौस्तुभ गावडे शिक्षक मतदाराच्या पसंतीला उतरणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 16, 2026

भाजपाच्या पसंतीला उतरलेले कौस्तुभ गावडे शिक्षक मतदाराच्या पसंतीला उतरणार

 भाजपाच्या पसंतीला उतरलेले कौस्तुभ गावडे शिक्षक मतदाराच्या पसंतीला उतरणार





 पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पुणे शिक्षक मतदार संघातील यंदाची निवडणूक बहुरंगी आणि बहुरंगी अशी तिरंगी लढत पहावयास मिळत आहे. भाजपाच्या कित्येक निष्ठावंत शिक्षक कार्यकर्त्याला या निवडणुकीला आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून असंख्य कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले परंतु उमेदवारीची माळ कोल्हापूर जिल्ह्यातील कौस्तुभ गावडे यांच्या गळ्यात पडली.

कौस्तुभ गावडे भाजपाचे कार्यकर्ते असून ते स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये संचालक आहेत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विविध जिल्ह्यांमध्ये असंख्य शाळा कॉलेजेस असून या शाळा कॉलेजेस मधील शिक्षक मतदारांनी पाठिंबा आणि मतदान मिळण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असल्यामुळे कौस्तुभ गावडे या संधीचा लाभ कितपत उठवता येणार हे पाहावे लागेल.

खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांचा पाठिंबा त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचे मंत्री महोदय चंद्रकांत पाटील यांचा पाठिंबा व मार्गदर्शन आणि असंख्य शिक्षक मतदारांचा पाठिंबा कौस्तुभ गावडे यांना असल्यामुळे विजयाची लाभणार की काय असे चित्र सद्यस्थितीला दिसून येत आहे.

कोल्हापूर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये भाजपाचे आमदार खासदार असल्यामुळे या भाजपा नेत्यांचे पाठबळ व पाठिंबा भाजपा उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या पाठीशी असल्यामुळे ही निवडणूक सहज जिंकू शकतात अशी शक्यता सद्यस्थितीला दिसून येत आहे.

पुणे शिक्षक मतदार संघामध्ये पाचही जिल्ह्यामध्ये भाजपाचे वर्चस्व असल्यामुळे त्याचप्रमाणे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्या जिल्ह्यातील सर्व भाजपा आमदार पुणे शिक्षक मतदार संघातील भाजपाचे उमेदवार कौस्तुभ गावडे हे निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील माजी शिक्षक  आमदार दत्तात्रय सावंत हे पुन्हा एकदा आमदारकीसाठी प्रयत्नशील आहेत. पुणे शिक्षक मतदार संघात आमदारकीचा अनुभव असलेले ते उमेदवार असल्यामुळे ते कितपत सरशी ठरतात हे देखील पाहावे लागेल. सोलापूर जिल्ह्यातील दत्तात्रय सावंत याच्या उमेदवारी बरोबरच भाजपाचे दुसरे निष्ठावंत कार्यकर्ते डॉ. बी पी रोंगे हे देखील भाजपा विरोधात बंड करून आपली अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे प्रचाराची एक फेरी त्यांनी संपूर्ण मतदारसंघांमध्ये पूर्ण केलेली आहे. शिक्षक मतदारांच्या कडे ते आपली बाजू त्याचप्रमाणे शिक्षकांचा साठी आपण काय प्रयत्न करणार आहोत याचे देखील ते आश्वासन देत आहेत. भाजपा पक्षाविरोधात बंड उभारून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची ठरवल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दोन शिक्षकांमध्ये मताची विभागणी ही मोठ्या प्रमाणात होणार आहे हे स्पष्ट दिसून येत आहे.

काही शिक्षक मतदार डॉ. बीपी रोंगे यांची अपक्ष उमेदवार डॉ. बीपी रोंगे यांचीही अपक्ष उमेदवारी दत्तात्रय सावंत यांची मतं खाण्यासाठी उभी केलेली उमेदवारी असून भाजपाचे कौस्तुभ गावडे यांच्या पथ्याशी पडणार आहे अशी देखील चर्चा शिक्षक मतदारांच्या मध्ये सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages