जिल्हा सरकारी वकील अॅड. आनंद कुर्डुकर यांचा सत्कार
खासदार उज्ज्वल निकम यांच्या हस्ते कुर्डुकर व अॅड. आनंद नरखेडकर यांचा गौरव
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर येथे जिल्हा सरकारी वकीलपदी अॅड. आनंद कुर्डुकर यांची नियुक्ती, तसेच अतिरिक्त सरकारी अभियोक्तापदी अॅड. आनंद नरखेडकर रुजू झाल्याबद्दल सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचे विशेष सरकारी वकील तथा खासदार पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. कटारिया, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. संतोष पाटील, उपाध्यक्ष अॅड. शर्मिला देशमुख, अॅड. परमानंद जवळकोटे, सचिव अॅड. भंडारे, सहसचिव अॅड. प्रियंका गोरंटी आणि खजिनदार अॅड. सिद्धाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. संतोष पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी अॅड. आनंद कुर्डुकर यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. खासदार उज्ज्वल निकम यांनीही अॅड. कुर्डुकर आणि अॅड. नरखेडकर यांना त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी अॅड. अमोगसिद्ध साखरे आणि अॅड. एन. के. शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना अॅड. आनंद कुर्डुकर यांनी पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. न्यायव्यवस्थेतील जबाबदारी पार पाडताना पीडितांना न्याय मिळवून देण्याला प्राधान्य देणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या सत्कार सोहळ्यामुळे सोलापूरमधील विधी क्षेत्रातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या.
No comments:
Post a Comment