सापटणे तलावात पाणी सोडा अन्यथा जनावरांसह रास्ता रोको! सापटणे, तांबवे व वेणेगावातील शेतकरी आक्रमक;
पावसाळ्यात पाऊस न पडल्याने सापटणे, तांबवे आणि वेणेगाव परिसरातील शेतकरी सध्या पाणीटंचाईच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहेत. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून सापटणे तलावात पाणी नसल्याने परिसरातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले
सापटणे पाणी वापर संस्थेने तलावात पाणी सोडण्याची वारंवार मागणी केली आहे. तसेच सापटणे, तांबवे आणि वेणेगाव ग्रामपंचायतींच्या वतीनेही दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी शासनाकडे पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दि. ९ ऑक्टोबर रोजीही संबंधित विभागाकडे निवेदन देण्यात आले. मात्र, अद्याप तलावात पाणी सोडण्यात आले नसल्याने १६ ऑक्टोबर रोजी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर जनावरांसह रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला.यावेळी माजी सभापती तुकाराम ढवळे,अशोक खटके,नागेश क्षीरसागर,यांचेसह तिन्ही गावातील शेतकरी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment