मुंबईचा सुपुत्र आणि आशियाई सुवर्णविजेता हॉकी गोलरक्षक सूरज करकेराचा उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 7, 2026

मुंबईचा सुपुत्र आणि आशियाई सुवर्णविजेता हॉकी गोलरक्षक सूरज करकेराचा उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते सत्कार

 

मुंबईचा सुपुत्र आणि आशियाई सुवर्णविजेता हॉकी गोलरक्षक सूरज करकेराचा उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते सत्कार  




मुंबई(कटूसत्य वृत्त):- आशियाई क्रीडा स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घालणाऱ्या भारतीय हॉकी संघातील गोलरक्षक आणि मुंबईचा सुपुत्र सूरज करकेरा याच्या यशाचा मुंबईत विशेष गौरव करण्यात आला. विधान परिषदेचे उपसभापती तसेच ‘हॉकी मुंबई सिटी’चे अध्यक्ष सचिन अहिर यांनी विधान भवन येथील आपल्या दालनात सूरज करकेराची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा विशेष सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी उपसभापती सचिन अहिर यांनी सूरजच्या उत्कृष्ट गोलरक्षणाचे कौतुक करत संपूर्ण भारतीय हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. ‘हॉकी मुंबई सिटी’चे अध्यक्ष या नात्याने त्यांनी सूरज करकेरा याला ५० हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित केले. मुंबईच्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचवल्याचा सार्थ अभिमान या वेळी व्यक्त करण्यात आला.

या विशेष सत्कार समारंभास ‘हॉकी मुंबई सिटी’चे कोषाध्यक्ष शृंगार तारक राऊळ, अर्जुन पुरस्कार विजेत्या हेलन सोय (वेरी), आंतरराष्ट्रीय हॉकीपटू मनोरमा, तसेच संस्थेचे सभासद देवेंद्र कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages