शूटिंग बॉल स्पर्धेत सोशल उर्दू हायस्कूलला विजेतेपद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 29, 2026

शूटिंग बॉल स्पर्धेत सोशल उर्दू हायस्कूलला विजेतेपद

 शूटिंग बॉल स्पर्धेत सोशल उर्दू हायस्कूलला विजेतेपद



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका व सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत दि. २३/१०/२६ रोजी सुभाष उद्यान येथे १७ वर्षाखालील शूटिंग बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा अंतिम सामना सोशल उर्दू हायस्कूल आणि सोशल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यात झाला. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात एस. एस. ए. सोशल उर्दू हायस्कूलने विजय मिळवला आणि विभागीय स्तरावरील सामन्यासाठी पात्रता मिळवली.  या स्पर्धेत उमरफारुख बद्दी, नोमान धोटेघर, अफवान पतलबाप आणि इस्माईल अत्तार यांचे विशेष उत्कृष्ट प्रदर्शन राहिले. संघातील खेळाडूंना अ. रहिम शेख, अलिम शेख, अवेज मर्चंट आणि कामरान दलाल यांचे मार्गदर्शन लाभले.
या संघाला व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. डॉ. अखलाक वडवान, सहसचिव इम्तियाज शेख, मुख्याध्यापक रसूल चौधरी, उपमुख्याध्यापक इम्तियाज शाब्दी, पर्यवेक्षिका यास्मिन शेख, पर्यवेक्षक अल्ताफ कुमठे आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages