उजनीवरील चार प्रस्तावित प्रकल्पांविरोधात सर्वपक्षीय आंदोलनाची गरज- उत्तरेश्वर कांबळे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 29, 2026

उजनीवरील चार प्रस्तावित प्रकल्पांविरोधात सर्वपक्षीय आंदोलनाची गरज- उत्तरेश्वर कांबळे

 उजनीवरील चार प्रस्तावित प्रकल्पांविरोधात सर्वपक्षीय आंदोलनाची गरज- उत्तरेश्वर कांबळे





करमाळा (कटूसत्य वृत्त):- उजनी जलाशयाच्या अस्तित्वाशी शासनाने खेळू नये अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठे जन आंदोलन उभा करू असा इशारा देत उजनीवरील चार प्रस्तावित प्रकल्पांविरोधात सर्वपक्षीय आंदोलनाची गरज असल्याने सर्वांनीच गटतट विसरून एकत्र यावे असे आवाहन भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी केले आहे.
करमाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.  उजनी जलाशय म्हणजे केवळ पाण्याचा साठा नसून करमाळा आणि इंदापूर तालुक्यांतील शेतकरी, कष्टकरी, मच्छीमार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाचा आधार आहे. अशा या उजनी जलाशयाच्या पाण्यावर आणि परिसरातील जागेवर अवलंबून असलेल्या उजनीवर एआय डेटा सेंटर, हायड्रोजन प्रकल्प, ऊर्जा प्रकल्प आदि इतर संबंधित प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावांवरून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वपक्षीय एकजुटीने लढवला पाहिजे, अशी ठाम भूमिका भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.
यावेळी बलभीम कांबळे,ओम गरड, सुखदेव गरड, प्रवीण कांबळे, सनी कांबळे, नामदेव कांबळे, शाहीर शिवाजी कांबळे, योगेश कांबळे , प्रशांत कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. चार प्रकल्पांमुळे उजनी जलाशयाच्या पाण्याचा वापर, स्थानिक जमिनींचे भवितव्य, पर्यावरणीय परिणाम याबाबत शासनाने अद्याप सर्वसामान्य नागरिकांसमोर स्पष्ट व पारदर्शक माहिती मांडणे आवश्यक आहे. ती न मांडल्याने समस्येचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यामुळे शासनाने विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणू नये विकासाच्या नावाखाली स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या पाण्याच्या हक्काबाबत असुरक्षितता वाटत असेल, तर शासनाने त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही.उजनी जलाशयाच्या पाण्यावर हजारो शेतकरी आणि अनेक गावांचे जीवन अवलंबून आहे. सिंचन, पिण्याचे पाणी, शेतीपूरक व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्था या सर्व बाबींचा विचार न करता कोणताही निर्णय घेणे भविष्यात गंभीर प्रश्न निर्माण करू शकते. त्यामुळे प्रस्तावित प्रकल्पांसाठी शासनाने गंभीर व्हावे असे आवाहन भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी केले आहे. शासनाने तात्काळ या उजनी वरील प्रस्तावित प्रकल्पाचा फेरविचार करावा व तात्काळ हे प्रकल्प रद्द करावेत अन्यथा भीम आर्मी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार आहे असा इशारा दिला आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages