कल्याणशेट्टी माध्यमिक विद्यालयाचा क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 29, 2026

कल्याणशेट्टी माध्यमिक विद्यालयाचा क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

 कल्याणशेट्टी माध्यमिक विद्यालयाचा क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने घेतल्या गेलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कल्याणशेट्टी माध्यमिक विद्यालयाच्या सिद्धाराम जमादार हा 100 व 200 मीटर धावण्यात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हासाठी निवड झाली आहे.  17 वर्षाखालील मुलांमध्ये 3000 मीटर धावण्यात संदीप चव्हाण हा तालुक्यात द्वितीय आला आहे. 17 वयोगटात श्रद्धा शहापुरे ही गोळा फेक व भालाफेक या दोन्ही खेळात तालुक्यात प्रथम आली आहे, 19 वर्षाखालील मुलींमध्ये शगोपिया शेख ही लांब उडी व तिहेरी उडी मध्ये तालुक्यात प्रथम आली,  अमन नदाफ हा 200 मीटर धावणे मध्ये प्रथम व 100 मीटर धावण्यामध्ये द्वितीय आला आहे. सुमित खांडेकर हा 58 किलो वजन गटात कुस्तीमध्ये तालुक्यात प्रथम आला आहे, तर गौरी झिंगाडे ही कराटे व तायक्वांदो खेळात तालुक्यात प्रथम आली आहे. प्रणाली पूल्लूर ही हातोडा फेक मध्ये द्वितीय, तर 4×100 रिले व 4×400 रिले मुलामध्ये तालुक्यात प्रथम.
   तालुकास्तरीय सांघिक हॉलीबॉल स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील मुलीमध्ये तालुक्यात प्रथम, तर 19 वर्षे मुलीच्या क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात प्रथम. 19 वर्षे खालील मुलांमध्ये कबड्डीत तालुक्यात प्रथम येऊन बाजी मारली आहे.
         सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक कुमार जाधव व श्रीशैल किणगे यांचे संस्थेचे अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, संस्थेचे संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संस्थेच्या संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, सचिव मल्लिकार्जुन मसुती, ज्युनिअर विभाग प्रमुख पूनम कोकळगी, सेमी विभागप्रमुख रूपाली शहा, प्रशालेचे मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages