माजी आमदार दत्तात्रय सावंत यांना विविध शिक्षक संघटनांचा जाहीर पाठिंबा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळातील घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, जुनी पेन्शन योजना आणि अनुदानाचा लढा विधिमंडळात प्रभावीपणे मांडणारे खंबीर नेतृत्व म्हणून माजी आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांना सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रमुख शिक्षक संघटनांनी एकत्र येत आपला जाहीर पाठिंबा घोषित केल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनील चव्हाण यांनी दिली. या जाहीर पाठिंब्यामुळे सावंत यांच्या उमेदवारीला मोठी ताकद मिळाली असून त्यांची बाजू अधिक भक्कम झाली आहे.
या प्रमुख संघटनांनी दिला पाठिंबा:
दत्तात्रय सावंत यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील २५ वर्षांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत खालील संघटनांनी त्यांना अधिकृत पाठिंबा दिला
1 बहुजन शिक्षक महासंघ
2 डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद
३. सोलापूर जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघ
४. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना
५. युवक शिक्षक कर्मचारी संघटना
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आणि निर्धार:
या महत्त्वपूर्ण बैठकीत व पाठिंबा घोषणा प्रसंगी शिक्षक चळवळीतील आघाडीचे नेते आणि पदाधिकारी अण्णासाहेब भालशंकर, सुनील चव्हाण, संतोष धारेराव , अ गफूर अरब आणि उल्हास बिराजदार यांनी आपली भूमिका मांडली.
"शिक्षकांच्या अडचणीच्या काळात अहोरात्र धावून जाणारे आणि रस्त्यावरील लढाईपासून ते शासनदरबारी आवाज उठवणारे दत्तात्रय सावंत हेच शिक्षकांचे खरे कैवारी आहेत," असा विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. तसेच, यंदाच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षक बांधव एकजुटीने सावंत सरांना पहिल्या पसंतीचे मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करतील, असा निर्धार अण्णासाहेब भालशंकर, सुनील चव्हाण आणि संतोष भालेराव यांनी बोलून दाखवले.
निवडणुकीत सावंतांचे पारडे जड:
दत्तात्रय सावंत हे थेट लोकवर्गणी आणि शिक्षकांच्या थेट संपर्कातून ही निवडणूक लढवत आहेत. मागील निवडणुकीत अत्यंत निसटता पराभव झालेल्या सावंत यांना यंदा सोलापुरातून मिळालेल्या या सर्वसमावेशक पाठिंब्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, शिक्षक मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
.png)
No comments:
Post a Comment