ऑर्किड स्कूलच्या विद्यार्थ्यांचा फुटबॉल स्पर्धेत ब्राँझ मेडल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील नामांकित नागेश करजगी ऑर्किड स्कूल मधील विद्यार्थ्याने शालेय शहरस्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत तृतीय क्रमांक प्राप्त केले आहे. या स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोमपा क्रीडा कार्यालय सोलापूर शालेय शहरस्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धेत सोलाउत्कृष्ट तांत्रिक खेळ,अष्टपैलु कामगिरी आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी प्रतिस्पर्ध्यावर मात करत तृतीय क्रमांक प्राप्त केलेले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी, संस्थेच्या सचिवा सौ. वर्षाताई विभुते, स्कूलचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, स्कूलच्या मार्गदर्शीका मीना पारखे, प्राचार्या रश्मी कुंभार यांनी शुभेच्छा दिल्या.
वरील सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख आनंद लिगाडे, ज्ञानदीप जाधव यांनी मार्गदर्शन केले.
.png)
No comments:
Post a Comment