यमाई तलावलगत बुद्धविहारासाठी जागा देण्याची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 9, 2026

यमाई तलावलगत बुद्धविहारासाठी जागा देण्याची मागणी

 यमाई तलावलगत बुद्धविहारासाठी जागा देण्याची मागणी





पंढरपूर(कटूसत्य वृत्त):-   यमाई तलावालगत बुद्धविहार उभारण्यासाठी शासन मालकीची जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सम्यक क्रांती मंचाच्या वतीने उद्या, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी आंदोलन करण्यात येणार आहे.

या मागणीसंदर्भात पंढरपूर नगरपरिषदेचा ठराव, समितीचा अहवाल तसेच जिल्हाधिकारी व महसूल विभागाचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. तरीही प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळालेली नसल्याने आंदोलन करण्यात येत आहे.

यमाई तलावाच्या दक्षिण-पश्चिम भागातील देवकते मळा परिसर लगत शासन मालकीच्या जमिनीचा बुद्धविहारासाठी विचार करून तातडीने आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी मंचाने केली आहे.

गेली १४ वर्षे प्रलंबित असलेल्या बुद्धविहाराच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा सम्यक क्रांती मंचाने दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages