सिंहगड इन्स्टिट्यूटतर्फे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगाव यांच्या वतीने व संस्थेचे सहसचिव संजय नवले यांच्या पुढाकाराने सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सन २०२६-२७ च्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. शनिवारी (दि. १७ ऑक्टोबर) महाविद्यालय परिसरात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी प्राचार्य डॉ. शंकर नवले यांच्या हस्ते संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस आफताब शेख, खजिनदार विजय गायकवाड, उपाध्यक्ष नितीन पात्रे, संगमेश जेऊरे, रुपेश हेळवे, चिटणीस लखन आदाटे, सहचिटणीस रोहित थळवे, कार्यकारिणी सदस्य रवींद्र दंतकाळे, श्रीनिवास मावनूर, गौतम गायकवाड, सचिन जाधव, अंबादास पोळ, आरती कुसेकर, महेश कुलकर्णी आणि सागर इप्पलपल्ली यांचा सत्कार करण्यात आला.
शैक्षणिक संस्था आणि प्रसारमाध्यमांमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी सिंहगड इन्स्टिट्यूट आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. याला सिंहगड संस्थेने सकारात्मक प्रतिसाद दिला.
प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त उपक्रम राबविण्यास कॅम्पस डायरेक्टर संजय नवले नेहमीच तत्पर असतात. त्यामुळे पत्रकार संघाच्या सहकार्याने संयुक्त कार्यशाळा आयोजित करण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
या कार्यक्रमास सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य तसेच सिंहगड इन्स्टिट्यूटचे जनसंपर्क अधिकारी रामकृष्ण लांबतुरे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment