नेत्रालयामुळे माढा तालुक्याच्या आरोग्य क्षेत्रातील वैभवात भर- बबनराव शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 26, 2026

नेत्रालयामुळे माढा तालुक्याच्या आरोग्य क्षेत्रातील वैभवात भर- बबनराव शिंदे

 नेत्रालयामुळे माढा तालुक्याच्या आरोग्य क्षेत्रातील वैभवात भर- बबनराव शिंदे 




माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यासह जिल्ह्यात एकही मोतिबिंदूचा रुग्ण राहू नये. नेत्ररुग्णांची माफक दरात तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेले सुसज्ज व अद्ययावत स्वरूपाचे तीन मजली नेत्रालयामुळे माढा तालुक्याच्या आरोग्य क्षेत्रातील वैभवात भर पडल्याचे प्रतिपादन माढेश्वरी अर्बन बँकेचे चेअरमन माजी आमदार बबनराव शिंदे यांनी केले आहे.

ते माढा येथील संकल्प फाऊंडेशन संचलित,कर्मयोगी आमदार बबनदादा शिंदे नेत्रालयास प्रथमच सदिच्छा भेट दिल्यानंतर बोलत होते.

पुढे माजी आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले की, मागील 17 वर्षांपासून माढा शहरात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे यशस्वी आयोजन केले आहे.या माध्यमातून सुमारे 23 हजार जणांची मोफत नेत्र तपासणी व 7700 हून अधिक रुग्णांच्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत.याकामी नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने,डॉ. रागिणी पारेख,डॉ.एकनाथ शेळके,डॉ.गणेश इंदूरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या व मोबाईलच्या युगात सातत्याने नेत्ररोग व नेत्ररुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया वेळेवर करता आली नाही म्हणून दृष्टीहीन होऊ नये यासाठी हे सुसज्ज व अद्ययावत तीन मजली नेत्रालय कार्यान्वित केले आहे.त्यांनी यावेळी अल्पावधीतच नेत्रालयाची उभारणी केल्याबद्दल कौतुक केले.

यावेळी संकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक लुणावत यांनी सांगितले की, माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे स्वप्न होते की, मतदारसंघात एक अद्ययावत रुग्णालय उभे करावे.त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आम्ही सर्वांनी विशेष प्रयत्न करुन अवघ्या 10 महिन्यात तीन मजली नेत्रालयाची उभारणी केली असून सर्व प्रकारच्या आधुनिक व अद्ययावत मशिनरी या ठिकाणी रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संकल्प फाऊंडेशनचे सचिव निलेश कुलकर्णी, पुरोहित बापू कुंभेजकर,स्वीय सहाय्यक नितीन मराठे, समाधान भांगे,अक्षय कवटे सुरेश कुबेर,प्रीती घळके, सुमन पाटोळे,छबुबाई पाटोळे,जयश्री शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages