सोलापूर स्ट्रीट बझारमधील मावा खाऊन थुंकणाऱ्यांवर पोलिसांचा 'ऍक्शन मोड' - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 5, 2026

सोलापूर स्ट्रीट बझारमधील मावा खाऊन थुंकणाऱ्यांवर पोलिसांचा 'ऍक्शन मोड'

 सोलापूर स्ट्रीट बझारमधील मावा खाऊन थुंकणाऱ्यांवर पोलिसांचा 'ऍक्शन मोड'

70 ते 80 युवक ताब्यात




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- होम मैदानालगतच्या स्ट्रीट बझार परिसरात मावा खाऊन थुंकणे, अस्वच्छता करणे आणि टवाळखोरी करणाऱ्या युवकांवर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री कारवाई केली. या कारवाईत सुमारे 70 ते 80 युवकांना ताब्यात घेण्यात आले.

आमदार देवेंद्र कोठे यांनी शुक्रवारी मध्यरात्री शहरातील स्वच्छतेची पाहणी करताना स्ट्रीट बझार परिसराचीही पाहणी केली होती. यावेळी ठिकठिकाणी मावा खाऊन थुंकल्याचे तसेच परिसर अस्वच्छ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती.

स्ट्रीट बझार हा नागरिक, महिला आणि लहान मुलांना स्वच्छ व सुरक्षित वातावरणात खाद्यपदार्थांचा आनंद घेता यावा, या उद्देशाने विकसित करण्यात आला आहे. मात्र, काही युवकांकडून येथे मावा खाऊन थुंकणे, कचरा करणे आणि परिसर विद्रूप करण्याचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी होत्या.

आमदारांच्या पाहणीनंतर 24 तासांच्या आत पोलिसांनी कारवाई करत शनिवारी रात्री या युवकांना ताब्यात घेतले. सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणे, अस्वच्छता करणे आणि परिसराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याने या प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना ज्या रस्त्यामुळे मोठी चर्चा झाली होती, त्याच परिसरात आता मावा खाऊन थुंकणाऱ्यांवर कारवाईची सुरुवात झाल्याची चर्चा सोलापुरात रंगली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages