टेंभूर्णीत पत्रकाराला शिवीगाळ व धमकी; एकावर गुन्हा दाखल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 5, 2026

टेंभूर्णीत पत्रकाराला शिवीगाळ व धमकी; एकावर गुन्हा दाखल

 टेंभूर्णीत पत्रकाराला शिवीगाळ व धमकी; एकावर गुन्हा दाखल


​टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त) :-  पोलीस कारवाईची बातमी वर्तमानपत्रात का प्रसिद्ध केली नाही, या कारणावरून दैनिक लोकमतचे टेंभूर्णी प्रतिनिधी गणेश दत्तात्रय पोळ ( वय 44 )रा. टेंभूर्णी यांना सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करून धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली  आहे. याप्रकरणी टेंभूर्णी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पत्रकार गणेश पोळ हे दैनंदिन काम आटोपून घरी जात असताना, कुर्डूवाडी चौकातील आशीर्वाद मेडिकलसमोर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी एकनाथ ईश्वर पोळ (रा. भवानीनगर रोड, टेंभूर्णी) तेथे आला. "काल टेंभूर्णी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर केलेल्या कारवाईची बातमी तू का! दिली नाहीस? आमच्यावर कारवाई झाली तेव्हा लगेच बातमी देऊन बदनामी केली होती," असा जाब विचारत त्याने वाद घातला.
​वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध करणे हे संपादकीय धोरणावर अवलंबून असते, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने सर्व पत्रकारांना मोठ्या आवाजात शिवीगाळ करत धमकी दिली.
​या घटनेनंतर ३ ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. यावरून आरोपी एकनाथ पोळ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) ३५१ (२), ३५२ आणि महाराष्ट्र प्रसार माध्यम सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास करमाळा उपविभागाच्या साहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages