पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण संपन्न
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणात सकाळच्या सत्रात पदवीधर मतदारसंघासाठी, तर दुपारच्या सत्रात शिक्षक मतदारसंघासाठी प्रशिक्षण देण्यात आले. पदवीधर मतदारसंघाच्या ११७ तर शिक्षक मतदारसंघाच्या ७६ मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
पदवीधर मतदारसंघासाठी उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुने, तर शिक्षक मतदारसंघासाठी उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे यांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणादरम्यान निवडणूक प्रक्रियेतील विविध बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणातील सूचना काळजीपूर्वक समजून घेऊन मतदान केंद्रावर त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण, त्रुटी किंवा हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी, यावर प्रशिक्षणात भर देण्यात आला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कसेकर, निवडणूक तहसीलदार एस. विभुते, नायब तहसीलदार शेख आदी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment