कर्मवीर कृषी महाविद्यालयात दीक्षारंभ
बार्शी (कटूसत्य वृत्त):- श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष बी.एस्सी. (ऑनर्स) कृषीच्या विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ समारंभ उत्साहात पार पडला.
मंडळाचे खजिनदार श्री. जयकुमार शितोळे (बापू) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी कृषी शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, रोजगाराच्या संधी आणि स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जे. डी. जाधव होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, परिश्रम व आत्मविश्वासाने प्रगती साधण्याचे आवाहन केले.
यावेळी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करून भेटवस्तू दिल्या. तसेच द्वितीय व तृतीय वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता महाविद्यालयातर्फे आयोजित सस्नेहभोजनाने झाली.
यावेळी कार्यालयीन अधीक्षक श्री. टी. एस. मोरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. डॉ. संतोष शेंडे, डॉ. महेश गुरव, प्रा. गणेश जाधव व प्रा. शाम आरगडे यांनी परिश्रम घेतले.
.jpg)
No comments:
Post a Comment